दम असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांना खोटारडं ठरवा; राहुल गांधींचं PM मोदींना ओपन चॅलेंज
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत सरकारची भूमिका मांडली. दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना खोटारडं म्हणावं, असं खुलं आव्हान दिलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा स्वत: केल्याचा दावा केला होता. त्यानंतर सरकारवर टीका केली जात आहे.
“तो दिवस दूर नाही जेव्हा…”; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेदरम्यान राजनाथ सिहांचे POK बाबत सूचक विधान
भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपणच शस्त्रविराम केल्याचे २९ वेळा सांगितलं होतं. पण पंतप्रधान मोदींनी एकदाही त्यांच्या दाव्याचं खंडन केलं नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या तुलनेत त्यांच्यात ५० टक्के जरी दम असेल तर त्यांना आज संसदेत सांगावं की ट्रम्प खोटं बोलत होते, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, सरकारने वैमानिकांचे हात बांधले गेले. हवाई दलाला मोकळीक देण्यात आली नाही. भारताने काही विमाने गमावली. ही लष्कराची चूक नव्हती, ती सरकारची चूक होती. पाकिस्तानच्या हवाई दलावर हल्ला का थांबवण्यात आला? सुरुवातीला चूक झाली हे सीडीएसने मान्य केलं. हवाई दलाला दोष देणं चुकीचं आहे. राहुल गांधी म्हणाले की ट्रम्प खोटे बोलत आहेत, आमची विमाने पडली नाहीत, पंतप्रधानांनी एवढेच बोलले पाहिजे.
पंतप्रधान मोदी त्यांच्या प्रतिमेसाठी सुरक्षा दलांचा वापर केला जातो, हे देशासाठी खूप धोकादायक आहे. खरं तर आपण पाकिस्तान आणि चीन दोघांशीही लढत होतो. मात्र काल सरकारकडून चीनबद्दल काहीही बोलण्यात आलं आहे. जर नरेंद्र मोदींमध्ये इंदिरा गांधींइतके ५० टक्के जरी धाडस असेल, तर त्यांनी सभागृहात सांगावं की ट्रम्प युद्धबंदीबद्दल खोटे बोलत आहेत.
पंतप्रधानांनी राष्ट्रीय हित लक्षात ठेवावे आणि तुमची प्रतिमा तयार करण्यासाठी सैन्य नाही. या सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलं आहे. खरी लढाई चीनशी होती. राहुल गांधी म्हणाले की पहलगाम हल्ल्यामागे मुनीरचा हात होता. पाकिस्तान आणि चीन दोघेही त्यात सहभागी झाले. सरकारला वाटलं की आपण पाकिस्तानशी लढत आहोत. खरं तर आपण पाकिस्तान आणि चीन दोघांशीही लढत आहोत.
‘पर्यटक सरकारच्या भरवश्यावर अन् सरकार देवाच्या…; प्रियांका गांधी सत्ताधाऱ्यांवर कडाडल्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील माणूस पाकिस्तानचा जनरल असीम मुनीर आहे. अलिकडेच मुनीरने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेवण केले. पंतप्रधान मोदींनी यावर काहीही बोलले नाही. ट्रम्प यांना त्यांच्या कार्यालयात आमंत्रित करण्याची हिम्मत कशी झाली?, अशी विचारणा त्यांनी केली नाही, असा आरोप त्यांनी केला.