Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear Talks : इराणच्या अडचणीत मोठी वाढ! नेतन्याहूंचा अमेरिकेला ‘हा’ गंभीर इशारा, अणु कराराचे समीकरण बदलणार?

Iran Nuclear Talks : इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यांनी अमेरिकेला इराणच्या अणु कार्यक्रमांवरुन गंभीर इशारा दिला आहे. यामुळे चर्चेची समीकरणे बदलणार का असा प्रश्न उपस्थित होतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2026 | 12:16 PM
Benjamin Netanyahu

Benjamin Netanyahu

Follow Us
Follow Us:
  • इराणचा अणु करार धोक्यात?
  • इस्रायलने अमेरिकेसमोर ठेवली ही अट
  • अणु करारावर समीकरणात होणार बदल?
Netanyahu on US Iran Nuclear Talks : अमेरिका (America) आणि इराणमध्ये सध्या त्यांच्या अणु कार्यक्रमावरुन वाटाघाटीची चर्चा सुरु आहे. अद्याप या चर्चेत कोणाताही ठोस निकाल लागलेला नाही. याउलट इराणच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. एकीकडे अमेरिकेने इराणच्या जवळ मध्यपूर्वेत सैन्य तैनाती  वाढवली आहे. तर दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी अमेरिकेला एक मोठा इशारा दिला आहे. यामुळे इराणचा अणु करार धोक्यात आला आहे.

गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?

नेतन्याहूंचा अमेरिकेला गंभीर इशारा

नुकतेच नेतन्याहूंनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची वॉशिंग्टन येथे भेट घेतली होती. याभेटीचा संदर्भ देत त्यांनी इराणच्या अणु कराराच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा इशारा दिला. त्यांच्या मते, केवळ युरेनियमचा साठा समृद्ध करण्यापासून थांबवणे पुरसे नाही, तर त्याच्या सृद्धीककरणासाठी लागणारी यंत्रणा, पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत.

अमेरिकेतील ज्यू संघटनेच्या वार्षिक परिषदेत नेतन्याहूंनी हे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नेतन्याहूंशी संशय व्यक्त केला आहे की, इराणचा युरेनियमचा साठा सृद्ध करणे थांबवले तरी, त्याची साहित्य नष्ट करणे महत्वाचे आहे. त्यांच्याकडे युरेनियम समृद्ध करण्याची क्षमता असेल तर इराण पुन्हा आपल्या अणु कार्यक्रमाला सुरुवात करु शकतो.

या आठवड्यात होणार दुसरी चर्चा

सध्या अमेरिका आणि इराणमध्ये (Iran) ओमानच्या मध्यस्थीने अणु चर्चा सुरु आहे. या आठवड्यात या चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. दरम्यान रविवारी (१५ फेब्रुवारी) एका इराणच्या राजदूताना अमेरिकेसोबतच्या नवीन अणु काराराचा फायदा दोन्ही देशांनी होईल अशी चर्चा सध्या सुरु आहे. गेल्या अनेक दशकांपासून इराण आणि अमेरिकेत अणु करारावरुन वाद सुरु आहे. सध्या पुन्हा सुरु झालेल्या या चर्चेत कोणता निकाल लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेच्या लष्करी हालचाली 

यावेळी अमेरिकेने मध्यपूर्वेत इराणच्या जवळील कॅरिबियन समुद्रात लष्करी हालचाली तीव्र केल्या आहेत. यामुळे मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकने जगातील सर्वात मोठा विमानवाहू युद्धपोत USS Gerald R. Ford तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच इतर काही युद्धनौकांची तैनाती देखील वाढवली आहे. अमेरिकेचे हे नवे विमानवाहू जहाज कॅरिबियन समुद्रातून रवाना होऊन मध्यपूर्वेत पोहचेल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी असाही इशारा दिला की अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असलेल्या अणु वाटाघाटी चर्चेवर कोणताही निकाल लागला नाही तर लष्करी पर्यायाचा वापर केला जाईल.

Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणच्या अणु कार्यक्रमावरुन बेंजामिन नेतन्याहू यांनी कोणता इशारा दिला आहे?

    Ans: नेतन्याहू यांच्या मते, केवळ युरेयिनमचा साठ थांबवणे पुरेसे नाही, तर इराणच्या युरेनिमसचा साठा समृद्ध करण्यासाठीच्या यंत्रणा देखील नष्ट केल्या पाहिजेत.

  • Que: अमेरिका आणि इराण अणु चर्चेची दुसरी फेरी कधी होणार आहे?

    Ans: या आठवड्यात अमेरिका आणि इराण अणु चर्चेची दुसरी फेरी ओमानमध्ये पार पडणार आहे.

  • Que: अमेरिका-इराण अणु चर्चा फसल्यास ट्रम्प काय पाऊल उचलू शकतात?

    Ans: अमेरिका-इराण अणु चर्चा फसल्यास ट्रम्प इराणवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे.

Web Title: Benjamin netanyahu on us iran nuclear talks middle east conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
3

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
4

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.