Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडवा..कोणतीही मशीद बांधली जाणार नाही; भाजप नेत्याच्या वक्तव्याने फुटले वादाला तोंड

मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडला पाहिजे, असे विधान भाजप नेते विनय कटियार यांनी केले आहे. यावरुन आता अयोध्येमध्ये पुन्हा एकदा मशीदीवरुन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 25, 2025 | 04:26 PM
Ram Janmabhoomi Dhannipur Mosque There is no mosque in Ayodhya, says BJP leader Vinay Katiyar

Ram Janmabhoomi Dhannipur Mosque There is no mosque in Ayodhya, says BJP leader Vinay Katiyar

Follow Us
Close
Follow Us:

No Mosque at Ram Janmabhoomi : अयोध्या : श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्यामध्ये मोठ्या लढ्यानंतर प्रभू रामांचे मंदिर उभारण्यात आले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा मशीद बांधण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. ‘अयोध्येत कोणत्याही मशिदीला परवानगी दिली जाणार नाही आणि मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडला पाहिजे, असे विधान भाजप नेते विनय कटियार यांनी केले आहे. यावरुन आता अयोध्येमध्ये पुन्हा एकदा मशीदीवरुन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, राम मंदिर आंदोलनाचे नेते आणि माजी खासदार विनय कटियार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी प्रस्तावित धन्नीपूर मशिदीबाबत बोलताना कोणतीही मशीद बांधली जाणार नाही असे विधान केले. म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत मशीद बांधू दिली जाणार नाही आणि मुस्लिमांनी येथून निघून जावे. एनओसी प्रलंबित असल्याने धन्नीपूर मशिदीच्या योजनेवर स्थानिक प्राधिकरणाच्या आक्षेपाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कटियार यांनी हे विधान केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भाजप नेते विनय कटियार म्हणाले की, “बाबरी मशीद ऐवजी अयोध्येत मशीद किंवा इतर कोणतीही मशीद बांधू दिली जाणार नाही. त्यांना (मुस्लिमांना) येथे राहण्याचा अधिकार नाही. आम्ही त्यांना कोणत्याही किंमतीत अयोध्येतून हाकलून देऊ आणि नंतर दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी करू, असे धक्कादायक विधान विनय कटियार यांनी केले आहे. अयोध्येतील धन्नीपूर मशीद प्रकरण बऱ्याच काळापासून चर्चेत आहे, परंतु आता स्थानिक प्रशासनाच्या आक्षेपांमुळे आणि भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा अधिक तापला आहे.

भाजप नेते विनय कटियार म्हणाले की, आम्हाला धन्नीपूर मशीद माहित नाही. तेथे काहीही बांधले जाणार नाही. जे लोक अयोध्येत मशीद बांधण्याबद्दल बोलत आहेत ते सर्व आम्ही नाकारले आहेत आणि हे यापुढेही होत राहील. ज्यांनी अयोध्येत मशीद बांधली त्यांनी शरयू नदीच्या पलीकडे जावे. गोंडा किंवा बस्तीला जा. अयोध्या रामाची नगरी आहे. येथे फक्त राम मंदिर आहे, असे मत विनय कटियार यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

नेमकं प्रकरण काय?

अयोध्या राम मंदिराच्या निर्णयानंतर 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला पर्यायी जागेवर मशीद बांधण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले. त्याचवेळी अयोध्या विकास प्राधिकरणाने मुस्लिम पक्षाला धनीपूरमध्ये मशीद बांधण्यासाठी पाच एकर जमीन दिली होती. त्यासाठी मुस्लिम पक्षाने इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टची स्थापना केली होती. ट्रस्टने एडीएकडे नकाशा मंजुरीसाठी अर्ज दाखल केला आणि विकास शुल्क म्हणून 1,68,515 रुपये आणि अर्ज शुल्क म्हणून 23,413 रुपये जमा केले. मात्र, अडीच वर्षांनंतरही ट्रस्टला विविध विभागांकडून आवश्यक कागदपत्रे आणि ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सादर करण्यात अपयश आले आहे. यामुळे एडीएने मशिदीच्या बांधकामाचा नकाशा नाकारला. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते विनय कटियार यांचे वक्तव्य आले आहे.

Web Title: Ram janmabhoomi dhannipur mosque there is no mosque in ayodhya says bjp leader vinay katiyar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • ayodhya
  • Ram Temple in Ayodhya
  • shree Ram

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.