Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tahawwur Rana: राणाने रचला होता देशभर हल्ल्याचा कट; NIA च्या चौकशीत खळबळजनक खुलासा

तहव्वूर राणा हा मुंबई प्रमाणेच भारतातील इतरही शहरांमध्ये हल्ल्याचा कट रचत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने शुक्रवारी तहव्वूर राणाची चौकशी सुरू केली.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 12, 2025 | 12:26 PM
Rana had planned attacks across the country; Sensational revelation in NIA investigation

Rana had planned attacks across the country; Sensational revelation in NIA investigation

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतले. राणाचे प्रत्यार्पण करुन भारतात आणल्यानंतर लगेच त्याला एनआयएने दिल्लीच्या पालम विमानतळावरूनच ताब्यात घेतले. त्याला १८ दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, तहव्वूर राणा हा मुंबई प्रमाणेच भारतातील इतरही शहरांमध्ये हल्ल्याचा कट रचत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने शुक्रवारी तहव्वूर राणाची चौकशी सुरू केली.

पहिल्या टप्प्यात एनआयए अधिकाऱ्यांनी राणाची शुक्रवारी सलग ३ तास चौकशी केली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याची आणखी दोन टप्प्यात चौकशी करण्यात आली. एनआयएच्या मुख्यालयात एका खास कक्षात राणाला ठेवण्यात आले आहे. या कक्षावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास लक्ष ठेवले जात आहे.

त्या वकिलांचे पुणे कनेक्शन: मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला न्यायालयात शिक्षेपासून वाचवण्याची जबाबदारी ज्या वकिलावर आहे. त्याचे पुण्याशीही नाते आहे. दिल्ली राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाच्या पॅनेलमध्ये सूचीबद्ध असलेले ३७ वर्षीय वकील पीयूष सचदेवा यांना न्यायालयाने तहव्वुर राणा यांचा बचाव करण्याची जबाबदारी दिली आहे. भारतीय

संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा- Tahawwur Rana: तहव्वूर राणाचा खटला लढणारे कोण आहेत पियुष सचदेवा? कोण मांडणार NIA ची बाजू

संविधानात अशी तरतूद आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांपासून शेवटपर्यंत स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा वकील नसेल. त्याला संबंधित राज्य किवा केंद्र सरकारकडून वकील उपलब्ध करून दिला जातो. जेणेकरून त्याला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार मिळेल.

फक्त पैसे नाहीत किंवा त्याचा खटला लढणारा वकील नाही म्हणून त्याला यापासून वंचित ठेवता कामा नये. पियुष सचदेवाने पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमधून एलएलबी पूर्ण केले. यानंतर त्यांनी किंग्ज कॉलेज लंडनमधून एलएलएम पदवी प्राप्त केली. तो गेल्या दशकाहून अधिक काळ वकिली करत आहे. या काळात त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल खटलेही लढले आहेत.

या चार मुद्यांवर तपास केंद्रीत

सूत्रांनुसार, एनआयएने आपला तपास प्रामुख्याने चार मुद्द्यांवर केंद्रित केला आहे. एक, हा हल्ला करण्यासाठी आर्थिक व्यवस्था कशी करण्यात आली. दोन, ज्यांनी तहव्वूर राणाला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळवून देण्यास मदत केली. देशभर फिरण्यासाठी त्याला संसाधने आणि सुविधा कोण पुरवत होते? तीन, भारतातील किती शहरांमध्ये हल्ले नियोजित होते. यामध्ये स्थानिक पाठिंबा किंवा रसद आणि मदत कोण देत होते ? चौथा, ज्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या हल्ल्याला पाठिंबा दिला. या हल्ल्यादरम्यान कोण निर्देश देत होते? या हल्ल्यात कोणत्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा सहभाग होता ?

संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा- Tahawwur Rana: हल्ल्यापूर्वी मुंबईतील ठिकाणांची रेकी, पाकिस्तानातून प्लॅनिंग अन् अटक; कसा सापडला तहव्वूर राणा?

Web Title: Rana had planned attacks across the country sensational revelation in nia investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • NIA Team
  • Tahawwur Rana

संबंधित बातम्या

Tahawwur Rana : २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
1

Tahawwur Rana : २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Tahawwur Rana: २६/११ मुंबई हल्ल्याबद्दल दहशतवादी राणाचा मोठा खुलासा; ‘हो, मी पाकिस्तानी लष्कराचा एजंट होतो…’
2

Tahawwur Rana: २६/११ मुंबई हल्ल्याबद्दल दहशतवादी राणाचा मोठा खुलासा; ‘हो, मी पाकिस्तानी लष्कराचा एजंट होतो…’

NIA Raid: मोठी बातमी! एनआयएकडून 5 राज्यांत छापेमारी; CRPF जवान व युट्यूबर अटकेत, प्रकरण काय?
3

NIA Raid: मोठी बातमी! एनआयएकडून 5 राज्यांत छापेमारी; CRPF जवान व युट्यूबर अटकेत, प्रकरण काय?

Tahawwur Rana: मुंबई 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
4

Tahawwur Rana: मुंबई 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.