Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रेमंड’चे संस्थापक विजयपत सिंघानिया यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास

विजयपत सिंघानिया यांनी १९८० ते २००० या काळात रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2026 | 09:33 AM
'रेमंड'चे संस्थापक विजयपत सिंघानिया यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास

'रेमंड'चे संस्थापक विजयपत सिंघानिया यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : रेमंडचे संस्थापक विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. वयाच्या ८७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आणि रेमंडचे सध्याचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, ‘अत्यंत दुःखाने आणि जड अंतःकरणाने, आम्ही पद्मभूषण डॉ. विजयपत कैलाशपत सिंघानिया यांच्या निधनाची माहिती देत आहोत’.

विजयपत सिंघानिया यांचे मुंबईत निधन झाले असून, त्यांच्यावर रविवारी चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुटुंबीय आणि मित्र परिवाराने रविवारी दुपारी १:३० वाजता हवेली, एल. डी. रुपारेल मार्ग येथे जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विजयपत सिंघानिया यांनी १९८० ते २००० या काळात रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली, रेमंडने केवळ सूट आणि कपड्यांपुरते मर्यादित न राहता, सिंथेटिक फॅब्रिक्स, डेनिम, स्टील, औद्योगिक फाईल्स आणि सिमेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये विस्तार केला.

हेदेखील वाचा : Credit Card द्वारेही भरता येतो Income Tax? काय आहे संपूर्ण प्रक्रिया, जाणून घ्या सविस्तर

सिंघानिया यांनी रेमंडला भारतातील सर्वात प्रतिष्ठित जीवनशैली आणि फॅब्रिक ब्रँडपैकी एक म्हणून स्थापित केले. १९९४ मध्ये, त्यांना भारतीय हवाई दलातर्फे ‘मानद एअर कमोडोर’ या पदवीने सन्मानित करण्यात आले. विमानचालन क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले. नोव्हेंबर २००५ मध्ये, वयाच्या ६७ व्या वर्षी, त्यांनी सुमारे ६९००० फूट उंचीवर हॉट एअर बलून उडवून एक ऐतिहासिक कामगिरी केली.

सिंघानिया यांच्या मागे हजारो कोटींची संपत्ती

माध्यमांच्या वृत्तानुसार, विजयपत सिंघानिया यांनी अंदाजे १२००० कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेवली आहे. २०१५ मध्ये, त्यांनी आपल्या कंपनीतील ३७% हिस्सा आपल्या मुलाकडे सुपूर्द केला. त्यांचे पुत्र, गौतम सिंघानिया, आता रेमंड ग्रुपचे प्रमुख आहेत.

Web Title: Raymond founder vijaypat singhania passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा
1

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा
2

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई
3

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
4

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.