Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Loan Fraud: तुमच्या नावावर गुपचूप कुणी घेतलंय कर्ज? आधार-पॅनचा गैरवापर २ मिनिटांत असा पकडा

Fake Loan Fraud: दिवाळीच्या सणासुदीत सायबर गुन्हेगारांकडून आधार आणि पॅन कार्डचा गैरवापर करून फेक लोन घेण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. तसेच CIBIL कडे Dispute नोंदवून cybercrime.gov.in किंवा 1930 या हेल्पलाईनवर तक्रार करावी. वेळेत क्रेडिट रिपोर्ट तपासल्यास आर्थिक फसवणूक लक्षात येण्यास मदत होऊ शकते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 08, 2026 | 05:31 PM
Fake Loan Fraud ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Fake Loan Fraud ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुमच्या नावावर फेक लोन आहे का, क्रेडिट रिपोर्ट तपासा.
  • CIBIL आणि सुरक्षित फिनटेक अॅप्सवरून लोन स्टेटस जाणून घ्या.
  • फसवणूक झाल्यास 1930 किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करा.

 

दिवाळीच्या सणासुदीत ऑनलाईन ऑफर्सच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी पॅन आणि आधार कार्डचा गैरवापर करून ‘फेक लोन’ घेण्याचे नवे फंडे शोधले आहेत. तुमच्या नकळत कोणा दुसऱ्याने तुमच्या नावावर इन्स्टंट कर्ज तर उचललं नाही ना, हे फक्त दोन मिनिटांत ऑनलाईन सिबिल किंवा फिनटेक अॅप्सद्वारे कसं तपासायचं, याची ही माहिती आहे, चला तर मग जाणून घेऊया.Fake Loan Fraud:

आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवर फक्त काही कागदपत्रांच्या आधारे झटपट कर्ज मंजूर केलं जातं, ज्याचा फायदा सायबर चोरटे घेतात. तुमच्या पॅन कार्डवर कोणतंही अनधिकृत कर्ज सुरू आहे की नाही, हे ऑनलाईन क्रेडिट रिपोर्टद्वारे तपासून फसवणूक झाली असल्यास तक्रार करणं खूप गरजेचं आहे.

तुम्हाला कधी कळतं तुम्ही फसलात?

अनेकदा लोकांना त्यांच्या नावावर कर्ज असल्याचं तोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत बँकांचे वसुली अधिकारी फोन करत नाहीत किंवा त्यांचा सिबिल स्कोअर अचानक घसरत नाही. या दिवाळीत तुमच्याही नकळत तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज लादलंय का, हे फक्त दोन मिनिटांत ऑनलाईन कसं तपासायचं आणि फसवणूक झाली तर कुठे तक्रार करायची, याची माहिती पुढे वाचा.

सायबर चोरटे तुमची फसवणूक कशी करतात?

आजकाल अनेक फिनटेक कंपन्या आणि इन्स्टंट लोन अॅप्स फक्त पॅन आणि आधार नंबरच्या आधारे काही मिनिटांत कर्ज मंजूर करतात. सायबर चोरटे वेगवेगळ्या डेटा लीक किंवा बनावट फिशिंग लिंक्सच्या माध्यमातून तुमचा पॅन नंबर मिळवतात. त्यानंतर तुमच्या फोटोमध्ये फेरबदल करून किंवा बनावट मोबाईल नंबर लिंक करून कागदपत्रांचा गैरवापर करतात आणि कर्ज उचलतात.

याचा थेट फटका तुमच्या क्रेडिट प्रोफाईलला बसतो.म्हणजे तुम्ही कधी कर्ज घेतलंच नाही, पण तुमच्या नावावर कर्ज दिसतं. आणि त्याचे हप्ते न भरल्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो. पुढे तुम्हाला खरंच कर्ज हवं असेल तेव्हा बँक तुम्हाला कर्ज देत नाही.

2 मिनिटांत ऑनलाईन असं तपासा लोन स्टेटस

तुमच्या नावावर कोणतंही अनधिकृत कर्ज सुरू आहे की नाही, हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमचा सिबिल किंवा क्रेडिट रिपोर्ट तपासावा लागेल. यासाठी खालील टेक प्लॅटफॉर्मचा वापर करा.

1. सिबिल वेबसाईट किंवा फिनटेक अॅप्सतुम्ही CIBIL च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मोफत वार्षिक क्रेडिट रिपोर्ट तपासू शकता.
याशिवाय OneScore, Paytm, Google Pay, किंवा Paisabazaar यांसारख्या नावाजलेल्या आणि सुरक्षित अॅप्सवर जाऊन ‘Check Credit Score’ वर क्लिक करा.
तिथे तुमचा पॅन नंबर, मोबाईल नंबर आणि नाव टाकून पडताळणी (OTP) पूर्ण करा.

RBI Rules On Old Cheque Book : मोठी बातमी! ३१ डिसेंबरनंतर जुनी चेक बुक बाद होणार? बँकेत चेक वापरण्यापूर्वी RBI चे नियम नक्की वाचा

2. क्रेडिट रिपोर्टचं विश्लेषण करातुमचा क्रेडिट रिपोर्ट डाऊनलोड केल्यानंतर ‘Accounts’ किंवा ‘Active Loans’ हा विभाग शोधा.
तिथे तुमच्या नावावर सध्या सुरू असलेल्या सगळ्या लहान-मोठ्या कर्जांची आणि क्रेडिट कार्ड्सची यादी दिसेल.
जर या यादीत तुम्ही न घेतलेलं एखादं कर्ज (उदा. 10,000 किंवा 20,000 रुपयांचं इन्स्टंट लोन) दिसत असेल, तर समजून जा की तुम्ही सायबर फ्रॉडचे शिकार झालात.

फसवणूक झाली तर काय करावं?

बँक किंवा लोन कंपनीशी संपर्क: क्रेडिट रिपोर्टमध्ये ज्या बँकेचं किंवा फायनान्स कंपनीचं नाव दिसतंय, त्यांच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा आणि त्यांना या फ्रॉड लोनबद्दल ई-मेलद्वारे लेखी कळवा.

सिबिल डिस्प्युट रेझोल्युशन: सिबिलच्या वेबसाईटवर जाऊन ‘Raise a Dispute’ या पर्यायावर क्लिक करा. तिथे संबंधित कर्ज तुमचं नसल्याचा दावा नोंदवा. सिबिल संबंधित बँकेकडून पडताळणी करून ते कर्ज तुमच्या रेकॉर्डमधून काढून टाकेल.

सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार: या फसवणुकीची अधिकृत तक्रार केंद्र सरकारच्या cybercrime.gov.in या सायबर पोर्टलवर नोंदवा किंवा 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवर कॉल करून लगेच गुन्हा नोंदवा.

Bank Holidays November : काय सांगता? बँकेची कामं तातडीने उरकून घ्या… पुढच्या आठवड्यात 6 दिवस बँका राहणार बंद

तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पॅन कार्डच्या गैरवापराबाबत FIR दाखल करा.सणासुदीच्या काळात डिजिटल सुरक्षितता बाळगणं हाच यापासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे. आजच तुमचा सिबिल रिपोर्ट तपासा आणि सुरक्षित राहा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: माझ्या नावावर कुणी फेक लोन घेतलं आहे का, हे कसं तपासायचं?

    Ans: CIBIL किंवा इतर अधिकृत क्रेडिट रिपोर्ट प्लॅटफॉर्मवरून तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा.

  • Que: क्रेडिट रिपोर्टमध्ये कोणता विभाग तपासावा?

    Ans: 'Accounts' किंवा 'Active Loans' विभाग तपासावा. त्यात तुमच्या नावावरील कर्जांची माहिती दिसते.

  • Que: पॅन कार्डचा वापर करून फेक लोन कसं घेतलं जातं?

    Ans: डेटा लीक, फिशिंग लिंक किंवा बनावट मोबाईल नंबरच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा गैरवापर करून फसवणूक केली जाऊ शकते.

Web Title: Fake loan fraud check pan aadhaar misuse cibil credit report online rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Business News
  • Loan
  • Marathi News

संबंधित बातम्या

Salman Khan Announces Rs 11 Movie Ticket: सलमान खानचा सिनेमा पाहण्याची सुवर्णसंधी! तिकीट फक्त ११ रुपये, पण आहे एक खास अट
1

Salman Khan Announces Rs 11 Movie Ticket: सलमान खानचा सिनेमा पाहण्याची सुवर्णसंधी! तिकीट फक्त ११ रुपये, पण आहे एक खास अट

Pooja Birari: पहिली दिवाळी, नवी मालिका अन् खास सरप्राइज! बांदेकरांच्या सुनेचा सणाचा बेत काय?
2

Pooja Birari: पहिली दिवाळी, नवी मालिका अन् खास सरप्राइज! बांदेकरांच्या सुनेचा सणाचा बेत काय?

Nagpur Sport : बॅडमिंटनमध्ये नागपूरच्या खेळाडूंनी पटकावली ६ पदके
3

Nagpur Sport : बॅडमिंटनमध्ये नागपूरच्या खेळाडूंनी पटकावली ६ पदके

Nagpur News : फलाटांवर नरकयातना घेऊन आली दिवाळी; नागपूरहून उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी
4

Nagpur News : फलाटांवर नरकयातना घेऊन आली दिवाळी; नागपूरहून उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.