गृहकर्ज, कार लोन स्वस्त होणार का? वाचा... काय म्हटलंय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी...
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आता ॲक्शनमोड मध्ये आली असून ज्या बँकांनी सेंट्रल बँकच्या सूचनेचे पालन केले नाही त्या बँकेवर कारवाई करायला सुरवात केली आहे. आरबीआयला असलेल्या अधिकारांचा वापर करत आरबीआयने त्या बँकांवर दंडसुद्धा ठोठावला आहे.
तुमचे खाते या बॅंकेत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कडक कारवाई केली असून आरबीआयने येस बँक ( YES Bank) आणि आयसीआयसीआय (ICICI) बँकेवर कारवाई करत कोटींचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियामानुसार, येस बँक आणि आयसीआयसीआय बँक मध्यवर्ती बँकेच्या अनेक नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे येस बँकेला ९१ लाख रुपये आणि
आयसीआयसीआय बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
[read_also content=”इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी, प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या अन्… पाहा VIDEO https://www.navarashtra.com/india/delhi-to-varanasi-indigo-flight-evacuated-due-to-bomb-threat-all-passengers-safe-539269.html”]
म्हणून या बँकांवर कारवाई
आरबीआयने अलीकडेच सांगितले की, दोन्ही बँका अनेक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाहीत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, येस बँकेवर ग्राहक सेवा आणि अंतर्गत आणि कार्यालयीन खात्यांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अशी अनेक प्रकरणे आरबीआयसमोर आली ज्यात बँकेने अनेक खात्यांमधून अपुऱ्या शिलकीमुळे शुल्क वसूल केले. तसेच अंतर्गत व कार्यालयीन खात्यांमधून बेकायदेशीर कामे केली जात होती.
आरबीआयने आपल्या मूल्यांकनात असे आढळून आले की 2022 मध्ये येस बँकेने अनेक वेळा असे केले होते. बँकेने आपल्या ग्राहकांच्या नावे काही अंतर्गत खाती उघडली आणि चालवली होती, जसे की फंड पार्किंग आणि ग्राहकांचे व्यवहार मार्गी लावण्यासाठी या सर्व सूचनांचे पालन केल्याने बँकेला ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयसीआयसीआय बँकेवर हा आरोप
त्याचप्रमाणे ICICI बँक कर्ज आणि ॲडव्हान्सशी संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळली आहे. यासाठी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. बँकेने अपूर्ण तपासाच्या आधारे अनेक कर्ज मंजूर केले, त्यामुळे बँकेला आर्थिक धोक्याचा सामना करावा लागला. आरबीआयच्या तपासात बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेतील त्रुटी समोर आल्या. बँकेने अनेक प्रकल्पांची व्यवहार्यता आणि कर्ज परतफेड क्षमतेचे तपशीलवार विश्लेषण न करता कर्ज मंजूर केले होते.
शेअरवर काय परिणाम झाला?
सोमवारी येस बँकेचा शेअर बीएसईवर 0.010 रुपयांच्या वाढीसह 23.04 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 2.10 रुपयांनी घसरले आणि 1,129.15
रुपयांवर बंद झाले.