Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन डझन जागांवर बंडखोरीची तयारी; भाजपकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू

भाजपने बुधवारी 67 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली असून त्यात तीन मंत्र्यांसह 9 आमदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. भाजपने 40 जागांवर नवे चेहरे उतरवले आहेत. तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या वीजमंत्री रणजित सिंह चौटाला, आमदार लक्ष्मण नापा, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुखविंदर शेओरान, प्रदेश उपाध्यक्ष जीएल शर्मा, सतीश खोला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 06, 2024 | 03:28 PM
दोन डझन जागांवर बंडखोरीची तयारी; भाजपकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू
Follow Us
Close
Follow Us:

हरियाणा:  हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये  बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत.   तिकीट नाकारल्यानंतर भाजपचे विद्यमान आमदारामध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. मनोहर लाल आणि नायब सरकारचे मंत्री रणजितसिंह चौटाला ते आमदार लक्ष्मण नापा यांच्यापर्यंत बिगुल वाजवले आहे. तिकीट जाहीर झाल्यापासून भाजपच्या जवळपास 32 नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे.  त्यामुळे राज्यातील सुमारे दोन डझन जागांवर भाजपचे राजकीय समीकरण अडचणीत आले आहे.  त्यामुळे पक्षाने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे.

भाजपने बुधवारी 67 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली असून त्यात तीन मंत्र्यांसह 9 आमदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. भाजपने 40 जागांवर नवे चेहरे उतरवले आहेत. तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या वीजमंत्री रणजित सिंह चौटाला, आमदार लक्ष्मण नापा, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुखविंदर शेओरान, प्रदेश उपाध्यक्ष जीएल शर्मा, सतीश खोला यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय मंत्री बिशंभर वाल्मिकी, माजी मंत्री कविता जैन, सावित्री जिंदाल आणि लतिका शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली.

हेदेखील वाचा: Maharashtra Election 2024: भाजप लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ॲक्शनमोडमध्ये; ‘या’ शिलेदारांना उतरवणार

यावेळी हरियाणात भाजपला आधीच सत्ताविरोधी लाटेच्या आव्हानांचा सामना करावा लागत असून आता तिकीट न मिळाल्याने नेत्यांच्या नाराजीने तणाव वाढला आहे. त्यामुळेच भाजपचे नेतृत्व डॅमेज कंट्रोलमध्ये व्यस्त आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीचे सहप्रभारी बिप्लब कुमार देब यांनी रोहतक येथील पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली आणि नाराज नेत्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी चार वरिष्ठ नेत्यांवर सोपवली आहे. यानंतरही भाजपच्या अनेक नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

कुठे-कुठे आणि कोणी दिला राजीनामा

– कुरुक्षेत्रातील भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या आई सावित्री जिंदाल यांनी हिसार विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

– रानिया विधानसभा मतदारसंघातून भाजपने आमदार आणि  वीजमंत्री रणजित सिंह चौटाला यांचे तिकीट रद्द केले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

-रतिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार लक्ष्मण नापा यांनी तिकीट नाकारल्यामुळे पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसमध्येही प्रवेश केला आहे.

हेदेखील वाचा: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आमदार सरनाईक यांच्यातर्फे गणेशोत्सवानिमित्त कोकणात

– माजी मंत्री कर्णदेव कंबोज यांनीही रादौर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

– सफिदोन विधानसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने भाजपचे दिग्गज नेते आणि माजी आमदार जसबीर देशवाल यांनी पक्ष सोडला. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे.

– उकलाना विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीमा गबीपूर यांनी पक्षाला अलविदा केला आहे.

– भाजपचे माजी आमदार शशी रंजन परमार यांना तोशाम मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, मात्र श्रुती चौधरी यांच्या नावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे.

– अटेली मतदारसंघातून तिकिटावर दावा करणारे भाजप ओबीसी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि पंचायत संघटनेचे माजी अध्यक्ष कुलदीप यादव यांनी बंडखोरी केली आहे.

– सामलखा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढलेले शशिकांत कौशिक भाजपकडून तिकीट न मिळाल्याने नाराज आहेत. तसेच मुल्लाना माजी आमदार राजबीर बरडा यांच्या समर्थकांनीही नाराजी व्यक्त केली.

Web Title: Rebellion in two dozen seats bjp is trying to damage control in haryana nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 03:28 PM

Topics:  

  • BJP
  • Haryana
  • haryana election

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.