Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार विशाल पाटलांना भाजपची ऑफर; विखे पाटील नेमकं काय बोलले?

राज्याचे महसूल मंत्री व भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचे जाहीर आमंत्र दिले. विखे पाटील यांनी आमंत्रण दिल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 02, 2026 | 01:29 PM
खासदार विशाल पाटलांना भाजपची ऑफर; विखे पाटील नेमकं काय बोलले?

खासदार विशाल पाटलांना भाजपची ऑफर; विखे पाटील नेमकं काय बोलले?

Follow Us
Follow Us:
  • खासदार विशाल पाटलांना भाजपची ऑफर
  • उपस्थितांमध्ये एकच खळबळ
  • विखे पाटील नेमकं काय बोलले?
सांगली : जत तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बोगद्याच्या अंतिम ब्लास्टचा कार्यक्रम रविवारी जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री व भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याचे जाहीर आमंत्र दिले. विखे पाटील यांनी आमंत्रण दिल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यावेळी विकासकामाच्या कार्यक्रमाला अचानक राजकीय रंग चढल्याचे पाहायला मिळाले.

 

कार्यक्रमात बोलताना विखे-पाटील म्हणाले, “विशाल पाटील हे तरुण आणि अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांनी इतर राजकीय फंदात न पडता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या प्रवाहात सामील व्हावे. जर ते भाजपमध्ये आले, तर त्यांचे मनापासून स्वागतच असेल.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे विखे-पाटील यांच्या थेट ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, विस्तारित म्हैसाळ योजनेअंतर्गत १,६०० मीटर लांबीच्या बोगद्याचा अंतिम ब्लास्ट पार पडला. या प्रकल्पामुळे जत तालुक्यातील ६५ गावांना दिलासा मिळणार असून, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. विकासकामाच्या कार्यक्रमात झालेल्या या राजकीय वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. खासदार विशाल पाटील यांची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : एकनाथ शिंदेंमुळेच मी पुन्हा राजकारणात सक्रीय, त्यांनी मला…; निलेश राणेंनी स्पष्टच सांगितलं

चंद्रकांत पाटलांनीही दिली होती ऑफर

गेल्या काही महिन्याखाली भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या ही वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती मिळेल असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या ऑफरला विशाल पाटलांनी प्रतिसाद दिला नाही, आता विखे पाटलांच्या ऑफरवर काय निर्णय घेतात? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Web Title: Radhakrishna vikhe patil has appealed to mp vishal patil to join bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • BJP
  • Minister Vikhe Patil
  • Radhakrishna Vikhe Patil
  • Vishal Patil

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: १० वर्षांत १५२ पेपरफुटी, पण एकालाही शिक्षा नाही…‘, विद्यार्थी’ कार्यक्रमात राहुल गांधींचा सरकारवर घणाघाती हल्ला
1

Rahul Gandhi: १० वर्षांत १५२ पेपरफुटी, पण एकालाही शिक्षा नाही…‘, विद्यार्थी’ कार्यक्रमात राहुल गांधींचा सरकारवर घणाघाती हल्ला

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत
2

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’
3

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?
4

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.