
Richest son of Indian Leader:
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शाह यांची २७ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षी हे पद मिळवणारे ते सर्वात तरुण आयसीसी अध्यक्ष ठरले आहेत. त्यांच्या या नियुक्तीनंतर त्यांच्या एकूण संपत्तीबाबतची चर्चा पुन्हा एकदा चांगलीच रंगू लागली आहे.
Shashi Tharoor News: ट्रम्प–ममदानी भेटीवरील थरूर यांची सोशल मीडिया पोस्ट; काँग्रेसच्या गोटात खळबळ
जय शाह यांची संपत्ती किती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह यांची एकूण संपत्ती सुमारे ₹१२५ ते ₹१५० कोटी दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यांच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत ‘कुसुम फिनसर्व्ह’ ही कंपनी असून, त्यामध्ये त्यांचा सुमारे ६० टक्के हिस्सा असल्याचेही रिपोर्ट्समध्ये नमूद केले आहे.
बीसीसीआयकडून पगार नाही
जय शाह हे पूर्वी ‘टेम्पल एंटरप्रायझेस’ कंपनीचे संचालक होते; मात्र ती कंपनी २०१६ मध्ये बंद झाली. सध्या ते बीसीसीआयचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत असले तरी या पदासाठी ते कोणताही पगार घेत नाहीत. त्यांच्या विविध कंपन्या आणि गुंतवणुकीत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाल्याचे सांगितले जाते.
जय शाह यांच्या संपत्तीत झालेली ही वाढ चर्चेचा विषय असली तरी देशातील अनेक नामांकित राजकीय कुटुंबांची संपत्ती त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. तरीही, जय शाह हे देशातील प्रभावी आणि श्रीमंत राजकीय वारसांपैकी एक म्हणून ओळखले जातात.