
Saudi Airlines Plane SV 3112: गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. या अपघातात 270 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच काल लखनऊ एअरपोर्टवरही एक मोठा अपघात टळला. सौदी अरेबियाहून येणाऱ्या विमानाच्या चाकांमधून अचानक ठिणग्या आणि धूर येऊ लागल्याने लखनऊ विमानतळावर गोंधळ उडाला. फ्लाइट एसव्ही ३११२ रात्री १०:४५ वाजता जेद्दाहहून निघाली. हज यात्रा पूर्ण केलेल्या २५० प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान सौदी अरेबियाहून लखनौ विमानतळावर पोहोचले होते. विमान धावपट्टीवरून पुढे जात असताना, डाव्या चाकातून धूर आणि ठिणग्या बाहेर पडताना दिसल्या, त्यामुळे वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान लँडिंग रोखले.
विमानात झालेला बिघाड लक्षात येताच पायलटने ताबडतोब एअर ट्रॅफिक कंट्रोलरला माहिती दिली. त्यानंतर विमानतळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी फोम आणि पाण्याचा फवाऱ्याने आग आटोक्यात आणण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २० मिनिटे लागली. तोपर्यंत विमानतळ कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही, तसेच कोणीही जखमी झाले नाही, परंतु घटनेदरम्यान विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण दिसून आले.
‘पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल… ‘, इराणी अधिकाऱ्याच्या ‘असा’ दावा पाकने लावला फेटाळून
शनिवारी रात्री ११:३० वाजता जेद्दाह विमानतळावरून विमान निघाले. विमानात क्रू मेंबर्ससह २५० प्रवासी होते. रविवारी सकाळी ६:३० वाजता विमान लखनौला पोहोचले. टेकऑफ आणि लँडिंग सामान्य होते पण धावपट्टीवर उतरल्यानंतर विमान धावपट्टीवर येत असताना ही घटना घडली.
दुसरीकडे जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरातून हैदराबादला येणाऱ्या एका विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते परत पाठवण्यात आले. पण, फ्रँकफर्टमधील तपासादरम्यान विमानात कोणताही बॉम्ब सापडला नाही. विमानाने उड्डाण केल्यानंतर त्यात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत विमान फ्रँकफर्टला परत बोलावण्यात आले. उड्डाणानंतर दोन तासांनी, विमान पुन्हा फ्रँकफर्टमध्ये उतरले. हे विमान लुफ्थांसा एअरलाइन्सचे होते. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर विमान कंपन्या अधिक सावधगिरी बाळगत आहेत.
AI चोरतोय तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती? कोणते टूल्स करतायत तुमची हेरगिरी? जाणून घ्या सर्वकाही
लंडनहून चेन्नईकडे जाणारे ब्रिटिश एअरवेजचे विमान हवेतच फिरून परतले
लंडनहून चेन्नईकडे जाणारे ब्रिटिश एअरवेजचे ड्रीमलाइनर 787-8 मॉडेलचे BA35 हे विमान तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर काही वेळातच डोव्हरजवळ हवेत चकरा मारून हिथ्रो विमानतळावर परत आले. प्राथमिक माहितीनुसार, ‘फ्लॅप फेल्युअर’मुळे हे निर्णय घेण्यात आला. ब्रिटिश एअरवेजकडून विमानाच्या उड्डाणाची नेमकी वेळ, त्यामधील प्रवासी व कर्मचाऱ्यांची संख्या, तसेच हवेत किती वेळ होते यासंबंधी कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
लाईव्ह फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24.com ने दिलेल्या माहितीनुसार, BA35 हे विमान सोमवारी दुपारी 12:40 वाजता लंडनहून चेन्नईकडे रवाना झाले होते आणि ते चेन्नईला पहाटे 3:30 वाजता पोहोचणार होते. विमानाने दुपारी 1:16 वाजता उड्डाण केले होते व त्यानंतर सुमारे दोन तास हवेत राहून विविध होल्डिंग पॅटर्नमध्ये फिरल्यानंतर हिथ्रो विमानतळावर सुरक्षितपणे परतले.