AI चोरतोय तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती? कोणते टूल्स करतायत तुमची हेरगिरी? जाणून घ्या सर्वकाही
सध्याच्या डिजिटल काळात AI आपल्या जीवनाच महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्या स्मार्टवॉचमध्ये आणि स्मार्टफोनमध्ये अनेक AI चॅटबोटचा समावेश असतो. हे AI आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मदत करतो. आपण आपल्या रोजच्या जीवनात ChatGPT किंवा Microsoft Copilot सारख्या AI असिस्टेंटचा वापर करतो. हे AI असिस्टेंट आपल्याला अगदी सहज आपल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात.
Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?
सध्या असे अनेक लोकं आहेत जे त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी AI असिस्टेंटवर अवलंबून असतात. सर्वांच्या फायद्याचा असणाऱ्या या AI असिस्टेंटबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातीलच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे AI असिस्टेंट युजर्सची माहिती चोरतो. वेस्ट वर्जीनिया यूनिवर्सिटीमध्ये साइबरसिक्योरिटीचे असिस्टेंट प्रोफेसर क्रिस्टोफर रमजान यांनी याबाबत रिसर्च केला आहे. त्यांच्या या रिसर्चमध्ये AI सिस्टम कशा प्रकारे आपली वैयक्तिक माहिती गोळा करत आहेत, आणि आपण कशा प्रकारे या सर्वांपासून आपली सुरक्षा करू शकतो, याबाबत माहिती देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Google Gemini)
क्रिस्टोफर यांनी सांगितलं आहे की, जनरेटिव AI जसे की ChatGPT आणि Google Gemini तुम्ही जे काही लिहीता, जसं की तुमचे प्रश्न किंवा सल्ला हे सर्व रेकॉर्ड करून स्टोअर केले जातं. याचा वापर संबंधित AI मॉडेलला अधिक चांगला बनवण्यासाठी केला जातो. जरी OpenAI सारखे काही AI प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रशिक्षणासाठी डेटा न वापरण्याचा पर्याय देतात, पण तरीही तुम्ही इनपुट केलेली माहिती स्टोअर केली जाते. अनेक कंपन्या तुमचा डेटा निनावी करण्याचा दावा करतात. जरी असं केलं तरी देखील निनावी केलेल्या डेटा युजरचा शोध देखील लावला जाऊ शकतो. त्यामुळे AI चा वापर करताना आपली माहिती चोरली जाण्याचा धोका कायम असतो?
जनरेटिव्ह AI व्यतिरिक्त, आपण दिवसभर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करतो. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिकटॉक यांचा समावेश आहे. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुमच्या वर्तनाचे सतत विश्लेषण करतात. प्रत्येक पोस्ट, फोटो, व्हिडिओ, लाईक, शेअर, कमेंट आणि तुम्ही किती वेळ एखाद्या गोष्टीकडे पाहिले या सर्व गोष्टींचा वापर करून एआय सिस्टम तुमचे डिजिटल प्रोफाइल तयार करू शकते. स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकर्स आणि होम स्पीकर सारखी स्मार्ट डिव्हाईस बायोमेट्रिक डेटा, व्हॉइस रेकग्निशन आणि लोकेशन ट्रॅकिंगमधून सतत डेटा गोळा करतात.
क्रिस्टोफर यांनी सांगितलं आहे की, AI टूल्सचा डेटा क्लाउडमध्ये स्टोअर केला जातो. याचा अर्थ कोणतेही थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म हा डेटा अॅक्सेस करू शकतो. स्मार्टवॉच किंवा व्हॉइस डिव्हाइसेसमध्ये जी माहिती रेकॉर्ड केली जाते ती माहिती AI अल्गोरिदममध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा युजर्सचे प्रोफाइल तयार करण्यासाठी वापरली जाते.
याशिवाय युजर्सना माहिती नसते की कोणता डेटा गोळा केला जात आहे आणि त्याचा वापर कसा केला जात आहे. अनेक कंपन्या कठिण भाषेत गोपनीयता धोरणे तयार करतात, ज्यामुळे सर्वसामान्यांना त्याबाबत माहिती मिळणं कठीण होतं. एका अहवालानुसार, सरासरी लोक टर्म्स ऑफ सर्विस फक्त 73 सेकंदात वाचतात आणि त्यावर सहमती देतात. पण जर या सर्व अटी नीट वाचल्या आणि समजून घेतल्या तर त्यासाठी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.