Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीरम इन्स्टीट्यूटने तयार केली कॅन्सरवरची लस, केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून मिळाली मंजुरी

केंद्रीय औषध प्रयोगशाळेत सफल झाल्यानंतर आता सर्व्हिकल कॅन्सरवर मात करणाऱ्या लशीला ग्रीन सिग्नल देण्यात आलाय. या लशीला यापूर्वी ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DGCAI)कडून मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय औषध प्रयोगशाळेत ही लस तपासण्यासाठी पाठवण्यात आली होती.

  • By साधना
Updated On: Feb 01, 2023 | 04:06 PM
सीरम इन्स्टीट्यूटने तयार केली कॅन्सरवरची लस, केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून मिळाली मंजुरी
Follow Us
Close
Follow Us:

कसौली: आपल्याच देशात निर्माण करण्यात आलेली आणि सर्व्हिकल कॅन्सरवर (Cervical Cancer) मात करु शकणारी लस अखेरीस तयार झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लशी तयार करणाऱ्या सीरम कंपनीनेच (Serum Institute) ही लस तयार केली आहे. या पहिल्या स्वदेशी ह्युमन पेपिलोमा व्हायरस व्हॅक्सीनचं नाव आहे CERVAVAC. कसौलीमध्ये असेलल्या केंद्रीय औषधांच्या प्रयोगशाळेतही मानकांवर ही लस पात्र ठरलेली आहे. या लॅबचे संचालक सुशील साहू यांनी ही माहिती दिलीय.

केंद्रीय औषध प्रयोगशाळेत सफल झाल्यानंतर आता सर्व्हिकल कॅन्सरवर मात करणाऱ्या लशीला ग्रीन सिग्नल देण्यात आलाय. या लशीला यापूर्वी ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DGCAI)कडून मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय औषध प्रयोगशाळेत ही लस तपासण्यासाठी पाठवण्यात आली होती. त्या ठिकाणी आठवडाभरात 3 बॅचमध्ये याचं परीक्षण करण्यात आलं. या 3 बॅचमध्ये 70 हजार औषधे होती. ज्याच्या गुणवत्तेची आणि परिणामांची तपासणी करण्यात आली.

अमित शाहा यांच्या हस्ते शुभारंभ
बालिका दिनाच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या हस्ते सर्व्हिकल कॅन्सरवर मात करणाऱ्या या पहिल्या स्वदेशी लशीचं लाँचिंग करण्यात आलं होतं. ही लस तयार होण्यासाठी सुमारे 6 ते 7 वर्षांचा काळ लागला. ह्युमन पेपिलोमा व्हायरसला तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्निकल इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट कौन्सिल आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेएशन यांनी सहकार्य केले आहे.

सर्व्हीकल कॅन्सर म्हणजे काय ?
सर्व्हीकल कॅन्सर हा सर्व्हीक्सचे लायनिंग म्हणजेच गर्भाशयायाच्या मुखाला ग्रासणारा कर्करोग आहे. सर्विक्सच्या लायनिंगमध्ये दोन तऱ्हेच्या कोशिका असतात. त्यांच्यापैकी एका तऱ्हेच्या कोशिका सपाट ( फ्लॅट ) असतात, तर दुसऱ्या स्तंभ कोशिका असतात. गर्भाशायामध्ये एक कोशिका दुसऱ्या कोशिकेमध्ये जिथे परिवर्तित केली जाते, त्या भागाला स्क्वेमो-कॉलमर जंक्शन असे म्हटले जाते. या भागामध्ये सर्व्हीकल कॅन्सर होण्याचे प्रमाण सर्वात अधिक असते. गर्भाशयाच्या मुखाशी विकसित होणारा कॅन्सर अतिशय सावकाशीने पसरतो. सर्व्हीकल कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, म्हणजेच एचपीव्हीमुळे उद्भवतो. हा व्हायरस यौन संबंधातून किंवा त्वचेच्या संबंधातून फैलावतो. काही महिलांच्या सर्व्हीक्समध्ये एचपीव्ही व्हायरसचे संक्रमण सतत होत असल्याने हा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. याचे निदान नियमित पॅप स्मियर नामक परीक्षणाद्वारे करता येते.

Web Title: Serum institute made first indigenous vaccine against cervical cancer nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2023 | 03:23 PM

Topics:  

  • Cervical Cancer
  • Health News

संबंधित बातम्या

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला
1

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी
2

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral
3

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा
4

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.