नवी दिल्ली: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोपखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राबद्दल मोठी अपडेट समोर आली आहेत. ज्योती मल्होत्राच्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसारस ज्योती पाकिस्तानसाठी भारतात हेरगिरी करत असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. ज्योतीच्या मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा अंतिम अहवाल हिसार पोलिसांना मिळाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ज्योतीला अटक केल्यानंतर हिसार पोलिसांनी तिच्या घराची झाडाझडती घेतील होती. या कारवाईत तिचा मोबाईल आणि लॅपटॉपसह इतर वस्तूही जप्त करण्यात आल्या होत्या, या मोबाईल आणि लॅपटॉपमधून १२ टीबी डिजिटल फॉरेन्सिक डेटा जप्त केला आहे. याशिवाय ज्योतीच्या बँक खात्यांमध्ये संशयास्पद पैशांचा ट्रेल असल्याचे उघड झाले आहे. ज्योती चार पीआयओंच्या संपर्कात होती आणि त्यांना त्यांची ओळख माहिती होती. डिजिटल डेटामध्ये कोणत्याही ग्रुप चॅटचे पुरावे नाहीत, तर फक्त एक-एक संभाषणे आहेत.
Mahim building collapsed: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, माहिममध्ये इमारतीचा भाग कोसळला
पाकिस्तानच्या पहिल्या भेटीनंतर, ज्योतीलाISI आणि पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या मान्यतेने विशेष व्हिसा आणि संरक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे पाकिस्तान दौऱ्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर तिच्या फॉलोअर्स आणि व्ह्यूजमध्येही अचानक वाढ झाली.
हिसार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानकडून जास्तीत जास्त सुविधा मिळत राहाव्या, या उद्देशाने ज्योतीने जाणूनबुजून आयएसआयच्या योजनांना पाठिंबा दिला. जी सोशल मीडियावरील इन्फ्लुएंजर्सला आकर्षित करण्यासाठी तिला नेहमी व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली,हीISISची एक सामान्य पद्धत आहे. हिसार पोलिसांना मिळालेले ज्योतीचे डिजिटल पुरावे इतके मजबूत आहेत की तिच्याविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्याची अटक वेळेवर झाली आणि एक मोठा राष्ट्रीय सुरक्षेचा संकट टळला. ती आधीच वैयक्तिक फायदे मिळविण्यासाठी पीआयओंच्या इशाऱ्यावर काम करत होती. त्याच्या पहिल्या पाकिस्तान भेटीपासूनच भारतीय एजन्सी त्याच्यावर लक्ष ठेवून होत्या. हिसार पोलिस ज्योतीला मिळालेल्या निधीच्या स्रोताचाही तपास करत आहेत.
महिला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या का घालतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
अलीकडेच, एका परदेशी कंटेंट क्रिएटर आणि ज्योती मल्होत्राचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ज्योतीच्या पाकिस्तानी कनेक्शनबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये साध्या वेशातील सुरक्षा कर्मचारी ज्योतीच्या मागे एके-४७ घेऊन चालत असल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ एका स्कॉटिश युट्यूबरने बनवला आहे, ज्यामध्ये ज्योती मल्होत्रा पाकिस्तानमधील एका सार्वजनिक ठिकाणी दिसत आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्योतीसोबत ६ ते ७ लोक दिसत आहेत, जे पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.
या लोकांच्या हातात AK-47 सारखी शस्त्रे दिसत आहेत. हे सर्व रक्षक ज्योतीला व्हीआयपी सारखी सुरक्षा प्रदान करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, स्कॉटिश युट्यूबरने स्वतः यावर आश्चर्य व्यक्त करत म्हटले आहे की, एका सर्वसामान्य युट्यूबरसाठी इतकी कडक सुरक्षा पाहून मला धक्का बसला.