Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asaram Bapu: मोठी बातमी! अत्याचार प्रकरणात आसाराम बापूला जामीन, SC चा निर्णय; मात्र…

Supreme Court: यापूर्वी आसाराम बापूला उपचारांसाठी खोपोलीत दाखल केले होते. एक आयुर्वेदिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. चोख सुरक्षा व्यवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 07, 2025 | 02:42 PM
Asaram Bapu: मोठी बातमी! अत्याचार प्रकरणात आसाराम बापूला जामीन, SC चा मोठा निर्णय; मात्र...

Asaram Bapu: मोठी बातमी! अत्याचार प्रकरणात आसाराम बापूला जामीन, SC चा मोठा निर्णय; मात्र...

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आसाराम बापू सध्या अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने त्याच्याबाबत एक मोठा निर्णय दिल आहे. अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला जन्मठेपेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरोग्याच्या कारणामुळे कोर्टाने आसाराम बापूला जामीन मंजूर झाला आहे.

सुप्रीम कोर्टाने अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या आसाराम बापूला जामीन मंजूर केला आहे. वैद्यकिय कारणांमुळे हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र हा अंतरिम जामीन केवळ 31 मार्चपर्यंत वैध असणार आहे. जामीन मिळाल्यानंतर आसाराम बापूने आपल्या अनूयायांना भेटू नये असे निर्देश दिले आहेत. आसाराम बापूवर सध्या जोधपुर येथील आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ते जोधपुरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

यापूर्वी आसाराम बापूला उपचारांसाठी खोपोलीत दाखल केले होते. एक आयुर्वेदिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. चोख सुरक्षा व्यवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू होते. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आसाराम बापूल जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मागील काही दिवसांपासून आसाराम बापूला हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता. मात्र आता उपचारांसाठी आसाराम बापूल 31 मार्च पर्यंत जामीन मंजूर केला आहे.

प्रकरण काय? 

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूने एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जोधपुर कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या आश्रमात एक महिला शिष्यवार अनेकदा अत्याचार केल्याप्रकरणी कोर्टाने त्याला दोषी ठरवले होते. आसाराम बापू सध्या 85 वर्षांचा आहे. 2013 पासून तो जोधपुर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. जोधपुर पोलिसांनी 2013 मध्ये एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली होती. दरम्यान पाच वर्षांच्या सुनावणीनंतर कोर्टाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Supreme Court grants interim bail to self-proclaimed godman Asaram Bapu on medical grounds in a 2013 rape case. Supreme Court directs that Asaram shall not attempt to tamper with the evidence, and shall not meet his followers after he is released on interim bail. pic.twitter.com/aYWs2goGaE

— ANI (@ANI) January 7, 2025

तसेच गुजरातमधील गांधीनगर येथील एका आश्रमात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूवर एक महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. 31 जानेवारी 2023 प्रकरणी कोर्टाने आसाराम बापूला या प्रकरणात देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान आता वैद्यकीय कारणांमुळे सुप्रीम कोर्टाने आसाराम बापूला जमीन मंजूर केला आहे. 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे. या कालावधीत आपल्या अनुयायांना भेटू नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच त्याच्या भोवती चोख सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे त्याला जामीन मिळाला असला तरी सुरक्षेत राहावे लागणार आहे.

सूरतमधील एका तरुणीवर 2013 मध्ये अत्याचार केल्याचा आरोप आसाराम बापूवर लावण्यात आला होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने अत्याचार केला असल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा असे आरोपी होते.

Web Title: Supreme court grant interim bail to asaram bapu for medical reason assissination case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • asaram bapu
  • life imprisonment
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Mumbai News  :   गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?
1

Mumbai News : गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन
2

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा
3

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा

Bihar Election: ‘SIR’ प्रक्रियेवरून विरोधकांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय
4

Bihar Election: ‘SIR’ प्रक्रियेवरून विरोधकांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.