पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच; सांबा जिल्ह्यात दिसले संशयित ड्रोन, सुरक्षा यंत्रणांना समजताच...
जम्मू : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कायम असलेल्या तणावामुळे जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या गोळीबार आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, जम्मू प्रदेशातील किमान पाच जिल्ह्यांतील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी आणि मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. त्यातच आता जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात संशयित ड्रोन पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संशयित ड्रोन आढळल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, भारतीय सुरक्षा दलांनी तात्काळ या ड्रोनवर कारवाई केली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात संशयित ड्रोन पाहायला मिळाले आहेत. भारतीय सुरक्षा दलांनी तात्काळ या ड्रोनवर कारवाई सुरू केली.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत ही घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
चीनचा पाकिस्तानला पाठिंबा
पाकिस्तानकडून केले जात असलेल्या भ्याड हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने शनिवारी पहाटे पाकिस्तानातील सहा प्रमुख लष्करी हवाई तळांवर शक्तिशाली स्फोटाने उडवले. यात पाकिस्तानी लष्करी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील तणाव वाढत आहेत. असे असतानाच चीनने भारताविरोधी भूमिका घेत पाकिस्तानला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी पाडले होते ड्रोन
काही दिवसांपूर्वी जम्मू, अखनूर, नगरोटा, अमृतसर आणि पठाणकोट या सीमावर्ती भागांमध्येही ड्रोन पाहायला मिळाले होते. तर यापूर्वी 8 मे रोजी सांबा सेक्टरमध्ये भारताने पाकिस्तानी ड्रोन पाडले होते.