Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamil Nadu: फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; अपघातात 6 कामगारांचा मृत्यू

Tamil Nadu Firecracker Factory Fire: तामिळनाडूमधील फटाके बनवणाऱ्या कारखान्यामध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचे काम सुरु असताना अपघात झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 04, 2025 | 04:33 PM
फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; अपघातात 6 कामगारांचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)

फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; अपघातात 6 कामगारांचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

तामिळनाडूमध्ये फटाके बनवणाऱ्या कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. या अपघातात सहा कामगारांचा मृत्यू झाला. तसेच 30 कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक तपासानुसार केमिकल मिसळत असताना हा स्फोट झाला. स्फोटात किमान एक खोली पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या खोलीतच मजूर काम करत होते. पोलीस आणि इतर संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. अग्निशमन आणि बचाव विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्फोट इतका जोरदार होता की एक संपूर्ण खोली उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, अपघातात 2 जवान शहीद

तामिळनाडूच्या या कारखान्यात फटाके बनवणारे 80 हून अधिक कामगार कारखान्यात काम करत होते. अग्निशमन आणि बचाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोट इतका शक्तिशाली होता की कारखान्याच्या चार खोल्या पूर्णपणे कोसळल्या. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, ते सर्व कारखान्यातील कामगारांचे होते. इतर तपास सुरू करण्यात आले.

#WATCH | Tamil Nadu: Six people died in an explosion that took place at a firecracker manufacturing factory in the Sattur area of Virudhunagar district. More details awaited: Prem Anand Sinha, South zone IGP pic.twitter.com/iEBSl7j6vX

— ANI (@ANI) January 4, 2025

वेलमुरुगन (५४) आणि कामराज (५४) कुरुंथमदंताई, नागराज (३७) चेट्टीकुरिची, मीनाची सुंदरम (४६), अरुप्पुकोट्टई, शिवकुमार (५६) कुरुंथमदंताई आणि कन्नन (५४) वीररापट्टी अशी मृतांची नावे आहेत. स्फोटाच्या वेळी सर्वजण प्रभावित भागात काम करत होते. याशिवाय एका गंभीर जखमीला विरुधुनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना लाख रुपयांची भरपाई

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. या अपघाताची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

विरुधुनगर, विशेषत: शिवकाशी, हे तामिळनाडूची फटाक्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते, राज्यातील बहुतेक फटाके कारखाने तेथे आहेत. 300 हून अधिक कारखाने विरुधुनगर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये अशा प्रकारचे फटाके तयार करतात. फटाका उद्योग विरुधुनगरमधील 1,150 कारखान्यांमध्ये अंदाजे चार लाख कामगारांना रोजगार देतो, भारताच्या फटाक्यांच्या उत्पादनात एकट्या शिवकाशीचा वाटा 70 टक्के आहे. 2024 मध्ये, विरुधुनगर जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये 17 अपघात झाले, परिणामी 54 मृत्यू झाले.

यापूर्वी दोन घटनांमध्ये 14 जणांचा मृत्यू

यापूर्वी तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यांना लागलेल्या आगीच्या दोन घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. पहिली घटना रंगापालयम भागातील आहे. फटाक्यांच्या नमुन्याच्या तपासणीदरम्यान हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, प्रवेश वर्मा अरविंद केजरीवालांना देणार आव्हान

Web Title: Tamil nadu news in marathi 6 dead in explosion at firecracker manufacturing unit in virudhunagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • Tamil Nadu

संबंधित बातम्या

भाजपला दक्षिणेत धक्का, या पक्षाने सोडली  NDA ची साथ, राजकीय समीकरणं बदलणार
1

भाजपला दक्षिणेत धक्का, या पक्षाने सोडली NDA ची साथ, राजकीय समीकरणं बदलणार

लक्झरी लाईफसाठी लक्झरी कारची चोरी; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या MBA मुलाचा २० वर्षांचा ‘कार’नामा, एकदा वाचाच
2

लक्झरी लाईफसाठी लक्झरी कारची चोरी; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या MBA मुलाचा २० वर्षांचा ‘कार’नामा, एकदा वाचाच

Amit Shah : “मी राहतो दिल्लीत, पण कान तमिळनाडूत” ; अमित शाहांचा DMK वर हल्लाबोल
3

Amit Shah : “मी राहतो दिल्लीत, पण कान तमिळनाडूत” ; अमित शाहांचा DMK वर हल्लाबोल

Pollachi Case : तब्बल ९ जणांना एकाचवेळी जन्मठेप : संपूर्ण देशाला हादरवून टाकणारं पोल्लाची प्रकरण नक्की काय आहे?
4

Pollachi Case : तब्बल ९ जणांना एकाचवेळी जन्मठेप : संपूर्ण देशाला हादरवून टाकणारं पोल्लाची प्रकरण नक्की काय आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.