Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलचा भारतीय दुतावासाकडून सत्कार, भारतीय चित्रपट गीतांवर लिपसिंक करुन जिंकली अनेकांची मने

टांझानियामधील(Tanzania) भारतीय उच्चायुक्त बिनाया प्रधान (Binaya Pradhan) यांनी सोमवारी २१ फेब्रुवारीला ट्विटरवर किली पॉल (Kili Paul Felicitated By Indian Embassy) याच्यासोबत एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. या फोटोमध्ये बिनाया प्रधान भारतीय दूतावासाच्या कार्यालयात पॉल याला सन्मानित करताना दिसत आहेत.

  • By साधना
Updated On: Feb 23, 2022 | 12:41 PM
kili paul

kili paul

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूडच्या प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून व्हिडीओ बनवणारा टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलला (Social Media Star Kili Paul) भारताने सन्मानित केले आहे. टांझानियामधील भारतीय दूतावासाने (Indian Embassy Felicitated Kili Paul) पॉल याला बोलावून त्याचा सन्मान केला आहे. किली पॉल भारतीय गाण्यांवर लिपसिंक करूनच जगभरात लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखांच्या घरात फॉलोअर्स आहेत. इतकेच नाही तर अनेक बॉलिवूड स्टारसुद्धा त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात.

टांझानियामधील(Tanzania) भारतीय उच्चायुक्त बिनाया प्रधान (Binaya Pradhan) यांनी सोमवारी २१ फेब्रुवारीला ट्विटरवर किली पॉल याच्यासोबत एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. या फोटोमध्ये बिनाया प्रधान भारतीय दुतावासाच्या कार्यालयात पॉल याला सन्मानित करताना दिसत आहेत. प्रधान यांनी ट्विट केले आहे की, “आज टांझानियातील भारतीय दुतावासात खास पाहुणे म्हणून किली पॉल यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांनी भारतीय चित्रपटांतील प्रसिद्ध गाण्यांवरील आपल्या व्हिडिओंनी लाखो भारतीयांची मने जिंकली आहेत.”

Today had a special visitor at the @IndiainTanzania ; famous Tanzanian artist Kili Paul has won millions of hearts in India for his videos lip-syncing to popular Indian film songs #IndiaTanzania pic.twitter.com/CuTdvqcpsb

— Binaya Pradhan (@binaysrikant76) February 21, 2022


किली पॉल याने सोशल मीडियाच्या आधारे भारतीय उच्चायुक्तालयाचे आभार मानले आहेत. त्याने लिहलं, “भारतीय उच्चायुक्तालय, आपले खूप-खूप आभार.” शेरशहा या चित्रपटातील गीत ‘रातां लंबिया’च्या ओळींवर लिपसिंक केलेला पॉल याचा व्हिडीओ गेल्यावर्षी बराच चर्चेत होता. या व्हिडीओमध्ये तो आपली बहीण नीना पॉल हिच्यासोबत दिसून आला. यानंतर पॉल इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय झाला असून सध्या त्याचे इन्स्टाग्रामवर जवळपास २२ लाख फॉलोवर्स आहेत. अभिनेता आयुष्मान खुराना, गुल पनाग आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकारांनी त्याला सोशल मीडियावर फॉलो केले आहे.

[read_also content=”कोणतीही नोटीस न देता मलिकांना ईडीने ताब्यात कसे घेतले? ईडीच्या माध्यमातून भाजप सत्तेचा गैरवापर करतेय, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटीलांची प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/how-did-the-ed-arrest-malik-without-any-notice-bjp-is-abusing-power-through-ed-reaction-of-supriya-sule-and-jayant-patil-243633/”]

किली पॉलच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये त्याचे वर्णन “डान्सर आणि कंटेंट क्रिएटर” म्हणून केले जाते. त्याचे युट्युब चॅनेलसुद्धा आहे, जिथे त्याचे सर्व लोकप्रिय व्हिडिओ पोस्ट केले गेले आहेत. खास गोष्ट म्हणजे तो त्याच्या पारंपारिक पोशाखात व्हिडिओ पोस्ट करतो, त्यामुळे त्याची लोकप्रियता आणखीनच वाढत आहे. भारताव्यतिरिक्त तो इतर देशांमध्येही लोकप्रिय होत आहे.

Web Title: Tanzania social media star kili paul felicitated by indian embassy nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2022 | 12:40 PM

Topics:  

  • Indian Embassy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.