मार्च 2022 नंतर इंडिगोच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण, शेअर 13 टक्क्यांनी आपटला! वाचा... सविस्तर
कोलकाता – कोलकाता (Kolkata) येथून इंडिगो विमानाने (Indigo Flight) मुंबईच्या (Mumbai) दिशेने उड्डाण केले. मात्र, १५६ प्रवासी घेऊन निघालेले विमान काही वेळात तांत्रिक बिघाड (Technical Failure) झाल्याने माघारी फिरले आहे. इंडिगो विमानाने आज दहा वाजता मुंबईकडे उड्डाण केले. यावेळी, विमान आकाशात गेले असताना अचानक इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने खळबळ उडाली. वैमानिकाने या गंभीर समस्येबाबत एटीसीला (ATC) सूचना देताच विमान पुन्हा कोलकता विमानतळावर लँड केले.
कोलकाताहून मुंबईच्या दिशेने उड्डाण केलेल्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाला. या तांत्रिकबाबत वैमानिकाला समजल्यानंतर त्याने तातडीने विमान कोलकाता विमानतळावर लॅंड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे इंडिगो विमान यु टर्न मारून पुन्हा कोलकता विमानतळावर पोहोचले. या संपूर्ण घटनेची इंजीनियर्स टीमकडून चौकशी केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड होत असल्याचे समोर येत आहे. ऑक्टोबरमध्ये दिल्लीहून बंगळुरुला निघालेल्या इंडिगो विमानाच्या इंजिनला आग लागली होती. त्यानंतर तातडीने विमानाची लॅंडिंग केली होती आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, असे इंडिगोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.