Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंडमध्ये मेट्रो प्रकल्पाचा खांब कोसळून झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 15, 2026 | 09:33 PM
मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! (Photo Credit- X)

मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई!
  • प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
  • मृतांच्या नातेवाईकांना १५ लाखांची मदत
Mumbai Metro Pillar Collapse News In Marathi : ईशान्य मुंबईतील मुलुंड भागात शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली, जिथे बांधकामाधीन मेट्रो रेल्वेच्या खांबाचा एक भाग अचानक कोसळला आणि अनेक दोन वाहने चिरडली गेली. या अपघातात चार जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान,  मुलुंड मेट्रो प्रकल्प अपघात प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिकृत माहिती पुढीलप्रमाण आहे.

५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबईतील मुलुंड पोलीस स्टेशन येथे BNS कलम 105, 110, 324(5) अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात प्रोजेक्ट डायरेक्टर, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनियर, सुपरवायझर आणि एक वर्कर अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडी (रिमांड) मिळावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासात निष्काळजीपणा व सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या मेट्रो प्रकल्पात दोन वेगवेगळ्या कंपन्यांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, दोन्ही कंपन्यांच्या जबाबदारीचा तपास सध्या सुरू आहे. अपघातामागील नेमके कारण, तांत्रिक त्रुटी अथवा मानवी निष्काळजीपणा याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे. अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

लग्नाच्या आनंदात आले, मेट्रोच्या पिलरखाली सापडला मृत्यू; जौनपूरच्या सरपंचांचा मुंबईत दुर्दैवी अंत

मृतांच्या नातेवाईकांना १५ लाखांची मदत

या अपघातात ४ जण जखमी झाले होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चार जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. रामधन यादव यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. राजकुमार यादव, महेंद्र यादव आणि दीपा रुहिया असे जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत. MMRDA कडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना १५ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

शनिवारी दुपारी १२:१५ वाजता, मेट्रो लाईन ४ (वडाळा–कासारवडवली) अंतर्गत बांधकामाधीन मार्गावरील पियर क्र. P196 जवळ मुलुंड अग्निशमन केंद्राच्या परिसरात उंचीवरून पॅरापेटचा एक भाग खाली कोसळून जात असलेल्या एका ऑटो-रिक्षा आणि कारवर कोसळला होता. या अपघातात चार नागरिक जखमी झाले असून त्यांना तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुर्दैवानं, जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ! आर्थिक राजधानीचा ‘अनिश्चितता निर्देशांक’ राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक; ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

Web Title: 5 people including project director booked for murder in mulund metro accident case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Metro
  • Mulund Accident
  • Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट; ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
2

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक
3

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू
4

Mumbai Rain : मुसळधार पावसात मुंबईत आणखी एक दुर्घटना; साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.