Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या निर्घृण हत्येनंतर पुन्हा तणाव, इंटरनेट सेवा बंद; परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये दिली ‘ही’ माहिती

विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अफवा रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढील ५ दिवस इंटरनेटवर पुन्हा बंदी घातली आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 27, 2023 | 02:48 PM
मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या निर्घृण हत्येनंतर पुन्हा तणाव, इंटरनेट सेवा बंद; परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये दिली ‘ही’ माहिती
Follow Us
Close
Follow Us:
मणिपूर : मणिपूरमधील हिंसाचारानंतर (Manipur Violence) परिस्थिती थोडी सुधारत असल्याचे दिसत असताना पुन्हा एकदा इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र त्यानंतर जुलै महिन्यात बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.  इंफाळमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली असून यानंतर मणिपूर सरकारने राज्यातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले.
[read_also content=”इराकमध्ये भर मांडवाची झाली स्मशानभूमी! लग्नसमारंभात भीषण आग, वधू-वरांसह जवळपास 100 जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/world/100-people-died-including-groom-and-bride-after-fire-catches-the-marriage-hall-in-iraq-nrps-462511.html”]

न्यूयॉर्कमध्ये मणिपूरवर काय म्हणाले परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर?

इथे न्यूयॉर्कमध्ये मणिपूरवर परराष्ट्रमंत्री डॉ.जयशंकर म्हणाले. एस जयशंकर म्हणाले, की मणिपूरमध्ये सुरु असलेल्या समस्येचा एक भाग म्हणजे तिथे येणाऱ्या स्थलांतरितांचा अस्थिर परिणाम. यामागे दीर्घकालीन इतिहास देखील आहेत. तेथे सामान्य स्थिती परत आणण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

काय आहे प्रकरण?

गेल्या मंगळवारी 6 जुलैपासून बेपत्ता झालेल्या मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल झाले होते. या चित्रांमध्ये विद्यार्थी जमिनीवर बसलेले दिसत आहेत, तर त्यांच्या मागे दोन सशस्त्र लोकही दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका फोटोमध्ये दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह दिसत आहेत. 17 वर्षीय हिजाम लिंथोइंगम्बी आणि 20 वर्षीय फिजाम हेमजीत अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
या मृतदेहांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अफवा रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढील ५ दिवस इंटरनेटवर पुन्हा बंदी घातली आहे. घटनेची माहिती मिळताच सीबीआयच्या पथकाने तपास सुरू केला. यासोबतच राज्यात उपस्थित असलेल्या तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून दिल्लीतील काही वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचत आहेत.

Web Title: Tension after death of two students in manipur internet ban nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2023 | 02:48 PM

Topics:  

  • Manipur
  • Manipur Violence
  • new york

संबंधित बातम्या

PM Modi: “42 देशांचा दौरा केला मात्र मणिपूरमध्ये…”; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
1

PM Modi: “42 देशांचा दौरा केला मात्र मणिपूरमध्ये…”; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

कोण आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी? न्यूयॉर्कच्या महापौर डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये मिळवला विजय
2

कोण आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी? न्यूयॉर्कच्या महापौर डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये मिळवला विजय

कोण आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी? न्यूयॉर्कच्या मेयरपदाच्या निवडणुकीत बीग-बींचे डायलॉग ऐकवून वेधत आहे मतदारांचे लक्ष
3

कोण आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी? न्यूयॉर्कच्या मेयरपदाच्या निवडणुकीत बीग-बींचे डायलॉग ऐकवून वेधत आहे मतदारांचे लक्ष

Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…
4

Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.