पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर पुन्हा तणाव; दोन्ही बाजूंकडून गोळीबार, पाक सैन्याकडून टॅंक तैनात
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानच्या बारमाचा सीमावर्ती भागात गुरुवारी सकाळपासून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गोळीबार सुरू आहे. हा भाग पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताला समांतर आहे. अफगाणिस्तानने सीमेवर नवीन चौक्या उभारल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. सकाळी सुरू झालेला गोळीबार काही काळानंतर थांबला होता, मात्र दुपारनंतर दोन्ही बाजून गोळीबार आणि मॉर्टार डागण्यात येत आहेत.
Pahlgam Attack Mastermind : ‘मी जगभर…’, पहलगाम हल्ल्याचा ‘मास्टरमाइंड’ने भारताविरोधात ओकली गरळ
पाकिस्तानच्या प्रमाणित वेळेनुसार, दुपारी ४:३० नंतर पुन्हा चकमकी सुरू झाल्या, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांताच्या अंतरिम प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही या चकमकीची पुष्टी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी पाकिस्तानी सैन्याने टँक तैनात केले असून अफगाण सीमेवर उभारण्यात आलेल्या चौक्यांना लक्ष्य केलं जात आहे.
पाकिस्तान आणि अफगाण तालिबान आज कट्टर शत्रू आहेत, दोघेही एकमेकांच्या सैनिकांच्या मृत्यूचा आनंद साजरा करतात. अफगाण तालिबान समर्थक-टीटीपी पाकिस्तानमध्ये त्यांच्या लष्करी चौक्या ताब्यात घेत आहे. आतापर्यंतच्या सर्व युद्धांमध्ये पराभव झाल्यानंतरही पाकिस्तानी सैन्याचे जनरल छातीवर पदके घेऊन फिरतात अशी थट्टा कोणत्याही देशाच्या सैन्याकडून नाही तर तहरीक-ए-तालिबान नावाच्या दहशतवादी संघटनेकडून केली जाते.
‘तिसरे महायुद्ध होणारच…; ‘या’ महासत्ता देशाच्या NSA च्या विधानाने उडाली जगभरात खळबळ
५ महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथील बाजौर येथील सालारझाई भागातील लष्करी तळावर पाकिस्तानी सैन्याचे सैनिक तैनात होते. पण टीटीपीने पाकिस्तानी सैन्याच्या समोर आपला झेंडा फडकवला होता. २८ डिसेंबर रोजी अफगाण तालिबानने पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात मोठा हल्ला केला. टीटीपीनेही यात त्याचे समर्थन केले. या हल्ल्यात १९ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकार हादरले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जेहरा बलोच यांनीही कबूल केले होते की पाकिस्तान सरकार इतक्या वर्षांपासून मदत करत असलेले तालिबान आता त्यांच्यासाठी समस्या बनलं आहे.