'तिसरे महायुद्ध होणारच...; 'या' महासत्ता देशाच्या NSA च्या विधानाने उडाली जगभरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: सध्या रशिया-युक्रेनमधील तीन वर्षापासून सुरु असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. याच दरम्यान रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्यावर केलेल्या विधानामुळे तणाव वाढला आहे.यामुळे रशियामध्ये संतापाचे वातावरण आहे.याचदरम्यान रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दिमित्री मेदवेदेव यांनी मोठे खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी तिसऱ्यया महायुद्धाची धमकी दिली आहे. यामुळे दोन महासत्ता देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच रशियाच्या पतनाची धमकी दिली होती. यामुळे पुतिन प्रशासनाने संताप व्यक्त केला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धबंदीच्या चर्चांदरम्यान ट्रम्प यांच्या या विधानामुळे अमेरिका आणि रशियात वादाची ठिणगी पडली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु प्रत्येक वेळी त्यांना अपयश मिळत आहे. अशातच युक्रेनवर केलेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी रशियाला धमकी दिली होती. पुतिन आगीशी खेळत असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले होते. दरम्यान रशियाने याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी ट्रम्प यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. अमेरिका रशियाचे वाईट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण यामुळे केवळ तिसरे महायुद्ध सुरु होईल असे दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, युक्रेनकडून पुतिनवरील हल्ले सुरुच आहेत.
तसेच ट्रम्प युद्ध न संपवू शकल्याने स्वत:च्या अपयशावर नाराज आहेत, पण त्यांवी समजूतदारपणा दाखवण्याऐवजी रशियाला धमक्या आणि व्यापाराचे आमिष दाखवत आहेत. पण रशिया कराराच्या पलीकडे कोणतीही चर्चा करण्यास तयार नाही.
Regarding Trump’s words about Putin “playing with fire” and “really bad things” happening to Russia. I only know of one REALLY BAD thing — WWIII.
I hope Trump understands this!— Dmitry Medvedev (@MedvedevRussiaE) May 27, 2025
तसेच ट्रम्प यांनी व्लादिमिर पुतिन यांना वेडेही म्हटले होते. त्यांनी पुतिन यांना कळत नाही की, मी रशियाच्या राष्ट्राध्यक्षापदी असतो तर युद्ध घडलेच नसते असेही खळबळजनक विधान केले होते. दरम्यान त्यांनी पुतिन यांना पतनाची धमकी दिली आहे. पुतिन विनाकारण लोकांना मारत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
याच वेळी रशियाने पाश्चात्य देश रशियाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. युक्रेनला शस्त्र पुरवठा केला जात आहे, यामुळे प्रादेशिक अस्थिरता निर्माण झाली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनीही, युद्धबंदी होणार नाही असे म्हटले आहे. तसेच रशियाने युरोपीय देशांसमोर युद्ध थांबवण्यासाठी एक मोठ अट ठेवली आहे. यामध्ये त्यांनी नाटोचा विस्तार थांबवण्याची आणि रशियाच्या सुरक्षेच्या हमीचे लेखी प्रतिज्ञा पत्राची मागणी केली आहे. आता युरोपीय देश यावर काय निर्णय घेतात यावर युक्रेन – रशियायुद्धाचे भविष्यतव्य आहे.