फोटो सौजन्य-X
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने(IMA) 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच आयएमएने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. आयएमएच्या अगोदर डॉक्टरांची संघटना फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (FORDA) ने कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या विध्वंसाच्या निषेधार्थ संपावर जाण्याची घोषणा केली आहे. फोर्डाने यापूर्वीही दोन दिवस संप केला होता मात्र त्यानंतर सरकारशी झालेल्या चर्चेनंतर संप मिटवण्यात आला. दरम्यान दिल्ली एम्समध्ये डॉक्टरांनी कँडल मार्च काढला त्यामध्ये डॉक्टरांनी कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बुधवारी रात्री काही लोकांनी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून प्रचंड तोडफोड केली. याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काल रात्रीच्या हिंसाचारावर फ्रोडाने काढले पत्रक
प्रसिद्धीपत्रकात असेही म्हटले आहे की, काल रात्रीच्या हिंसाचाराने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. हे आमच्या पेशातील काळ्या बाजूला दाखवतो. एक संघटना म्हणून आम्ही आमच्या निवासी डॉक्टरांशी एकता सिद्ध करत आहोत. या संकटाच्या काळात आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांची सुरक्षेची खात्री करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेचे पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्रालय आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध करत आहोत.
सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट लागू करण्याची मागणी
दुसरीकडे, दिल्लीतील सर्व सरकारी रुग्णालयांच्या रेजिडेंट डॉक्टर एसोसिएशन हे सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट लागू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात उद्या 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी इंडिया गेटवर कँडल मार्चची तयारी सुरू आहे.
काल रात्री महिलांनी ‘वुमन, रिक्लेम द नाईट’ आंदोलन केले होते. यावेळी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास काही लोक कोलकाता येथील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसले आणि त्यांनी वाहनांवर हल्ला केला आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुरही सोडला होता.