महाराष्ट्र : दहावी-बारावीचे विद्यार्थी निकालाची उत्सुकतेने वाट बघत होते ती प्रतीक्षा आता संपलेली आहे.
आयसीएसई बोर्डाकडून नुकताच दहावी-बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये यंदाही मुलींनी बाजी मारली असल्याचे दिसून आले.
नॅशनल काउंसिल फॉर द इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिशन ( CISCE) बोर्डाचा इयत्ता दहावी-बारावीचा निकाल सोमवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्य़ात आला. हा निकाल विद्यार्थी cisce.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतात. विशेष म्हणजे बारावीचा निकाल सर्वोत्कृष्ठ लागला आहे.
दहावी- बारावीच्या वर्गात मुलींनी मुलांवर मात केली आहे. दहावीमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.65 टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण 99.31 टक्के आहे. तसेच बारावीमध्ये 98.92 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत आणि 97.53 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. आयसीएसई बारावी इयत्ता बोर्डाच्या परीक्षेत तब्बल 98,088 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दहावीच्या परीक्षेला तब्ब्ल 2,42,328 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दहावी-बारावीच्या निकालामध्ये मुली वरचढ चढल्याचे दिसून येते. विभागानुसार देखील टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक आहे. आयसीएसईनुसार या परीक्षेसाठी 2503 परीक्षा केंद्रे आणि 709 मुल्यमापन केंद्रे होती.