नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून अंतरिम बजेट सादर केला जात आहे. टॅक्स स्लॅबमध्ये कोणता बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेषतः पगारदार वर्गाचे लक्ष लागले होते. मात्र, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अंतरिम अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही, असे स्पष्ट केले.
या अर्थसंकल्पात तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील. पॅसेंजर रेल्वे गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल. मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार आहे. प्रत्येकाला कायमस्वरूपी घरे दिली जातील. स्किल इंडियामध्ये 1.47 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील. विमानतळांची संख्या वाढली आहे. एव्हिएशन कंपन्या एक हजार विमानांची ऑर्डर देऊन पुढे जात आहेत. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार केला जाईल. मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे.
आयकर स्लॅबमधील बदलांपासून ते सवलतींपर्यंत, करदाते त्यांच्या आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक धोरणांवर प्रभाव टाकणार्या या निवडणूक वर्षात आर्थिक विकासाला चालना आणि वित्तीय शिस्त, असे दुहेरी आव्हान स्वीकारताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी आयकर स्लॅबमध्ये काेणताही बदल हाेणार नाही, असे स्पष्ट केले.