Kolkata Law College Rape Case: "एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर..."; TMC खासदाराच्या विधानाने वाद पेटला
कोलकाता: कोलकातामध्ये एका विद्यार्थिनी बलात्काराची घटना घडली आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लात उसळली आहे. पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे. तर आज कॉलेजच्या सुरक्षारक्षकाला देखील अटक करण्यात आली आहे. मात्र आता या बलात्कार प्रकरणावर टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विधानाने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
कोलकाता येथील लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनिवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीनमध्ये एक तृणमूल कॉँग्रेस पक्षाचा नेता देखील आहे. आता याच पक्षाचे खासदार त्यांच्या विधानाने अडचणीत सापडले आहेत.
खासदार कल्याण बॅनर्जी यांचे विधान काय?
जर एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर काय करता येईल? आता शाळा, कॉलेजमध्ये पोलिस तैनात केले जातील का? गुन्हे आणि छेडछाड कोण करते? काही पुरुष असे कृत्य करतात. महिलांनी या विकृत पुरुषांविरुद्ध लढले पाहिजे. ज्याने हे कृत्य केले आहे, त्याला ताबडतोब अटक करावी असे मी वारंवार सांगत आहे. पण एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर तो भ्रष्टाचार कसा असू शकतो? जोवर पुरुषांची मानसिकता सुधारत नाही तोवर या घटना घडत राहणार.
खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विधानाने एकच गदारोळ उडाला आहे. भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. आता या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ही घटना कोणत्याही पक्षाशी किंवा संघटनेशी सबंधित नसल्याचे म्हटले आहे.