Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज नवी दिल्लीत जगातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी; G-20 परिषदेचा आजचा कार्यक्रम कसा असणार? वाचा एका क्लिकवर…

या परिषदेमुळं जागतिक पातळीवर भारताचे वजन व दबदबा वाढणार असून, त्यामुळं संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. पाहूया आजचा दिवसभरातील कसा असणार कार्यक्रम...

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 09, 2023 | 08:44 AM
आज नवी दिल्लीत जगातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी; G-20 परिषदेचा आजचा कार्यक्रम कसा असणार? वाचा एका क्लिकवर…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आजपासून दोन दिवस नवी दिल्लीत जी-२० शिखर परिषद होत आहे. यामुळं संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. G20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit India) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन  (US President Joe Biden) काल भारतात दाखल झालेत. तर जी-20 परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक त्याचबरोबर ४० हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधीं काल दिल्लीत दाखल झालेत. त्यांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (शुक्रवारी) केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध घडामोडींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या परिषदेमुळं जागतिक पातळीवर भारताचे वजन व दबदबा वाढणार असून, त्यामुळं संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. पाहूया आजचा दिवसभरातील कसा असणार कार्यक्रम… (Today in New Delhi, the meeting of world leaders; How will today’s program of the G-20 summit be? Read in one click)

Happy to have welcomed @POTUS @JoeBiden to 7, Lok Kalyan Marg. Our meeting was very productive. We were able to discuss numerous topics which will further economic and people-to-people linkages between India and USA. The friendship between our nations will continue to play a… pic.twitter.com/Yg1tz9kGwQ — Narendra Modi (@narendramodi) September 8, 2023

 

कसा असणार कार्यक्रम?

सकाळी 9:30 ते 10:30: शिखर स्थळ, भारत मंडपम येथे नेते आणि शिष्टमंडळांच्या प्रमुखांचे आगमन, त्यानंतर ट्री ऑफ लाइफ फोयर येथे पंतप्रधानांसोबतचे स्वागत छायाचित्र. त्यानंतर, नेते आणि शिष्टमंडळाचे प्रमुख भारत मंडपम येथील लीडर्स लाउंज, लेव्हल 2 मध्ये एकत्र येतात.
सकाळी 10:30 ते दुपारी 1:30: ‘वन अर्थ’ नावाचे पहिले सत्र भारत मंडपम येथील समिट हॉलमध्ये होईल, त्यानंतर कामकाजाचे जेवण होईल.
01:30 ते 3:30: विविध द्विपक्षीय बैठका आयोजित केल्या जातील.
दुपारी 3:30 ते 4:45 पर्यंत: दुसरे सत्र, ‘एक कुटुंब’ शिखर परिषदेच्या ठिकाणी होईल ज्यानंतर नेते त्यांच्या हॉटेलमध्ये परततील.
संध्याकाळी 7 ते 8: रात्रीच्या जेवणासाठी नेते आणि शिष्टमंडळाच्या प्रमुखांचे आगमन, आगमनाच्या स्वागताच्या छायाचित्राने सुरुवात.
रात्री 8 ते रात्री 9: रात्रीच्या जेवणानंतर चर्चा करतील.
रात्री 9 ते रात्री 9:45: दिवसाचा शेवट करण्यासाठी नेते आणि शिष्टमंडळाचे प्रमुख भारत मंडपम येथील लीडर्स लाउंजमध्ये एकत्र येतील

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार

नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे. या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ समूहामध्ये दोन गट पडले आहेत. गेल्या वर्षीच्या बाली परिषदेतही तीव्र मतभेद झाले होते. यावेळीही अमेरिका आणि युरोपीय महासंघ युक्रेनचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. यामध्ये हवामान बदल आणि जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. तसेच या G-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. लहान आकाराच्या अणुभट्ट्या, व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबतही चर्चा होणार आहे. दोन्ही नेते GE फायटर जेट इंजिन करारावर चर्चा करणार होते. या कराराला अमेरिकेच्या संसदेने नुकतीच मंजुरी दिली होती.

किती देशांचा G-20 मध्ये समावेश

या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. यावर्षी भारताने बांगलादेश, इजिप्त, नेदरलँड, मॉरिशस, नायजेरिया, सिंगापूर, स्पेन, संयुक्त अरब अमिराती, ओमान या देशांना विशेष आमंत्रित केले आहे.

Web Title: Today in new delhi the meeting of world leaders how will today program of the g twenty summit be read in one click

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2023 | 08:25 AM

Topics:  

  • delhi
  • G-20 Summit

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
2

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी
3

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

दिल्लीतील रामलीलामध्ये Bobby Deol करणार रावणाचा वध
4

दिल्लीतील रामलीलामध्ये Bobby Deol करणार रावणाचा वध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.