देशातील सर्व टोलनाके (Toll Naka) बंद करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. टोलनाक्यावरील टोलवसुलीच्या ऐवजी आता आता हायटेक पद्धत वापरण्यात येईल. कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वयंचलित (Automatic Toll) पद्धतीने टोल वसुली केली जाणार आहे.
[read_also content=”उद्योजक अनिल अंबानींना इन्कम टॅक्सची नोटीस, 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा ठपका https://www.navarashtra.com/latest-news/income-tax-notice-to-anil-ambani-in-case-of-tax-evasion-of-rs-420-crore-nrps-319464.html”]
त्यामुळे टोलनाक्यांवरील खोळंबा कायमचा संपेल, असा विश्वासही व्यक्त केला जातोय. येत्या काळात ही स्वयंचलित पद्धत नेमकी कितपत यशस्वी ठरते, हेही स्पष्ट होईल. दरम्यान, देशातील सर्व टोलनाके नेमकी कधीपर्यंत बंद केले जाणार, हे कळू शकलेलं नाही. मात्र त्यासाठीच्या प्रयत्नांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. सध्या देशात फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसुली केली जाते. टोलनाक्यावर फास्टॅग नसलेल्लाय वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला होता. टोल नाक्यांवरील वाहनांची वाहतूक वेगाने व्हावी, यासाठी ही फास्टॅग प्रणाली आणण्यात आली होती. आता त्याच्या एक पाऊल पुढे जात कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने टोलनाके नेमके कसे काम करणार आहेत, हेही लवकरच स्पष्ट केलं जाईल.
[read_also content=”इगतपुरीजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी https://www.navarashtra.com/maharashtra/accident-near-igatpuri-in-nashik-one-died-and-5-injured-nrps-319493.html”]