Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाला सुप्रीम कोर्टाची निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला स्थगिती

Marathi Breaking Live Marathi : राजकारण, समाजकारण, क्रीडा क्षेत्रासह देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...सर्वच स्तरावरील महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी 'नवराष्ट्र'ला सातत्याने भेट द्या...

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2025 | 07:22 PM
Top Marathi News Today : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची तयारी सुरु

Top Marathi News Today : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची तयारी सुरु

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Live Updates : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. आयोगाने बुधवारी ही माहिती दिली. गृह मंत्रालयाने 22 जुलै रोजी धनखड यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. त्यामुळे आता उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे आयोगाने सांगितले.

जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारणास्तव उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. धनखड यांनी २०२२ मध्ये उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. मात्र, हा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

The liveblog has ended.
  • 24 Jul 2025 06:45 PM (IST)

    24 Jul 2025 06:45 PM (IST)

    इंग्लंडमध्ये १८ वर्षीय मराठी खेळाडूचा डंका! वैभव सूर्यवंशीला टाकले मागे; रचला मोठा विक्रम

    भारतीय पुरुष संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. तर दुसरीकडे अंडर 19 चा संघ देखील इंग्लंडचे मैदान गाजवत आहे.अशातच वैभव सूर्यवंशी सद्या खूप चर्चेत आहे. त्याची बॅट तळपत असल्याचे दिसत आहे. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. आता मात्र मुंबईकर आयुष म्हात्रेने देखील आपला जलवा दाखवण्यात कसली कमी ठेवली नाही. टीम इंडियाच्या अंडर 19 चा कर्णधार आयुष म्हात्रेने सूर्यवंशीपेक्षा दोन जास्त सिक्स मारले आणि एक रेसिर्ड बनवला आहे. इतकच नाही, अंडर 19 टेस्ट मॅचमध्ये आयुष म्हात्रेने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. असे करणारा तो एकमेव भारतीय कर्णधार बनला आहे.

  • 24 Jul 2025 06:12 PM (IST)

    24 Jul 2025 06:12 PM (IST)

    रस्त्यांवरील गाड्यांवरच कोसळले विमान; क्षणार्धात आग अन्…, इटलीत घडला भीषण अपघात

    Plane Crash: सध्या जगभरात विमान अपघातांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. इटलीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इटलीमध्ये देखील एक विमान क्रॅश झाले आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इटलीमधील एका रस्त्यावर वाहने धावत दिसत आहेत. त्याचवेळी एक विमान त्या ठिकाणी क्रॅश झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • 24 Jul 2025 05:38 PM (IST)

    24 Jul 2025 05:38 PM (IST)

    वासामुळे कांदा-लसूण खाणे सोडले आहे का? आरोग्याला मिळतात जबरदस्त फायदे, वाचाच…

    Health News: आपण आपल्या रोजच्या आहारात अनेक पदार्थांचा समावेश करत असतो. रोजचे पदार्थ तयार करताना असताना त्यात काही मसाले, किंवा काही पदार्थ मिसळणे हे अत्यंत महत्वाचे असते. तसेच आपल्या रोजच्या जेवणात कांदा आणि लसूण या दोन गोष्टींचा समावेश असतो. भारतीय जेवणांमध्ये यांचे महत्वाचे स्थान आहे. याशिवाय जेवण करणे ही कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. भाजी, वरण, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये याचा समावेश केला आहे. कांदा आणि लसणाचे फायदे देखील आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • 24 Jul 2025 05:18 PM (IST)

    24 Jul 2025 05:18 PM (IST)

    पुणे महानगर क्षेत्र होणार ग्रोथ हब…; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला नीती आयोगाचा ‘मास्टरप्लॅन’

    पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पुण्याला ग्रोथ हब बनविण्यासंदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा करणार असून यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करेल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

  • 24 Jul 2025 05:17 PM (IST)

    24 Jul 2025 05:17 PM (IST)

    धक्कादायक! पती-पत्नीचा वाद; संतप्त बापाने १८ महिन्यांच्या मुलाला बोअरवेलमध्ये फेकलं

    राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक धक्कादायक बातमी आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग एका बापाने १८ महिन्यांच्या मुलावर काढला आहे. या चिमुकल्याला नराधम बापाने मुलाची हत्या करून मृतदेह बोअरवेलमध्ये फेकून दिला. जमवरमगडच्या दीपोला गावात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून जयपूर येथील आपत्ती निवारण पथक मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी रवाना झालं आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 24 Jul 2025 04:55 PM (IST)

    24 Jul 2025 04:55 PM (IST)

    Honda CB125 Hornet भारतात सादर

    होंडाने विविध सेगमेंटमध्ये बाईक, कार आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये CB125 Hornet सादर केली आहे.Honda CB125 Hornet भारतात अनेक उत्तम फीचर्ससह आणण्यात आली आहे. यासोबतच, ही अतिशय स्टायलिश, टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ही बाईक कम्युट बाईकसोबत स्पोर्टी फील हव्या असणाऱ्यांसाठी आणण्यात आली आहे. बाईकमध्ये एसीजी सायलेंट स्टार्टर आणि इंजिन स्टॉप स्विच देखील आहे, ज्यामुळे ट्रॅफिक सिग्नलवर बाईक थांबवणे आणि रीस्टार्ट करणे सोपे होते.

  • 24 Jul 2025 04:50 PM (IST)

    24 Jul 2025 04:50 PM (IST)

    महाड MIDC येथून 88.92 कोटी किटामाईन अंमली पदार्थ जप्त

    महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलिस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे ₹88.92 कोटी किंमतीचा किटामाईन अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

  • 24 Jul 2025 04:50 PM (IST)

    24 Jul 2025 04:50 PM (IST)

    सावंतवाडीमध्ये भरवस्तीत गव्यांचा मुक्तसंचार

    सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शिरोडा नाका रस्त्याच्या शेजारी भरवस्तीत रानगव्यांच्या कळपाचा मुक्तसंचार दिसून आला. भरवस्ती शेजारी दिवसाढवळ्या गव्यांचा कळपाचा वावर असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या भागात गव्यांचा कळप स्थिरावला असून अचानकपणे या गव्यांचा कळप रस्त्यावर येत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये ही भीतीचे वातावरण आहे. या अगोदर सुद्धा गव्याच्या धडकेत काही प्रवासी जखमी झाले आहेत. सावंतवाडीत उपवनसंरक्षक यांचे कार्यालय असून त्या ठिकाणापासून काही अंतरावर या गव्यांच्या कळपाचा वावर आहे. मात्र, वनविभाग कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

  • 24 Jul 2025 04:40 PM (IST)

    24 Jul 2025 04:40 PM (IST)

    मीरा-भाईंदर शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

    मीरा-भाईंदर शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येवर तीव्र संताप व्यक्त करत आज काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, नागरिकांना होणारा त्रास आणि प्रशासनाची निष्क्रियता याविरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. हेल्मेट फावडा घमेला घेऊन पालिकेच्या मुख्य आंदोलन करण्यात आले.

  • 24 Jul 2025 04:30 PM (IST)

    24 Jul 2025 04:30 PM (IST)

    देवगड-निपाणी राज्यमार्गावर मोठे भगदाड

    सिंधुदुर्गात देवगड-निपाणी राज्यमार्गावर भगदाड पडले असून यावरून मोठी वाहतूक सुरू असते. तोंडवळी-बावशी दरम्यान तीन ते चार फुटांचे हे रस्त्याला भगदाड पडले आहे. हे भगदाड रस्त्याच्या मध्यभागी असून अजूनही मार्गावरून वाहतुकच आहे. सध्या या राज्यमार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, पडलेल्या भगदाडाकडे कॉन्ट्रॅक्टरच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

  • 24 Jul 2025 04:20 PM (IST)

    24 Jul 2025 04:20 PM (IST)

    कर्जत मधील वाहतुकीच्या समस्येने नागरिक हैराण

    कर्जत मधील वाहतुकीची समस्या जटील बनली आहे. त्यावर मार्ग निघावा म्हणून महाराष्ट्र भुषण डॉ.  नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्जत साठी शंभर बॅरिकेटस देण्यात आले.राज्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे समाजाच्या हितासाठी तसेच समाज प्रबोधन करणारे महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्जत पोलीस स्टेशन यांना १०० बॅरिकेटस चे वाटप करण्यात आले.

  • 24 Jul 2025 04:10 PM (IST)

    24 Jul 2025 04:10 PM (IST)

    वडखळ नाक्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

    पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांचा सामना करूनच रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. याची प्रचिती यावर्षीही दिसत असून वडखळ नाक्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. वडखळ नाका म्हणजे कायमच मोठ मोठ्या गाड्यांची वाहतूक सुरु असते. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याला मोठ्य़ा प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरु आहे. प्रशासनाला प्रवाशांना होणारा त्रास दिसतच नाही की दिसूनही डोळे झाक केली जात आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • 24 Jul 2025 04:01 PM (IST)

    24 Jul 2025 04:01 PM (IST)

    दिवा चौकाच्या नामांतरासाठी मनसे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांच्या पुढाकार

    दिवा चौकाचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करावे अशी मागणी मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे. याबाबत येत्या 10 ऑगस्टला दिवावासीयांच्या साक्षीने या चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करणार असल्याची घोषणा मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.

  • 24 Jul 2025 04:01 PM (IST)

    24 Jul 2025 04:01 PM (IST)

    देशात चाललंय काय? सर्व खेळांमध्ये कुस्ती डोपिंगमध्ये दुसऱ्या स्थानी; नाडाच्या निलंबित यादीत अल्पवयीन खेळाडूंचा समावेश

    राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेच्या (नाडा) निलंबित खेळाडूंच्या यादीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, भारतातील सर्व खेळांमध्ये कुस्तीमध्ये डोपिंगचे प्रकरण दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ही संख्या १९ आहे, परंतु चिंताजनक बाब म्हणजे त्यापैकी पाच अल्पवयीन आहेत. जर कुस्तीमध्ये डोपिंगचा धोका ज्युनियर स्तरावर पसरला असेल, तर परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वी संबंधितांनी जागे होण्याची आणि सुधारणात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात करण्याची वेळ आली आहे.

  • 24 Jul 2025 03:52 PM (IST)

    24 Jul 2025 03:52 PM (IST)

    जोरदार गोळीबारानंतर आता हवाई हल्ला; थायलंडने उद्ध्वस्त केले कंबोडियाचे F-16 रॉकेट

    थायलंड आणि कंबोडियामध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. गुरुवारी (२४ जुलै) दोन्ही देशांत अंदाधुंद गोळीबार सुरु झाला होता. यामध्ये दोन थाई सैनिक गंभीर जखमी झाले होते. दरम्यान आता या युद्धाने अधिक तीव्र रुप घेतले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले सुरु केले आहेत. आतापर्यंतच्या संघर्षात९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जखमी झाले आहेत. थायंडलने कंबोडियावर हवाई हल्ला केला आहे.  थायलंडच्या लष्कराने, कंबोडियाच्या F-16 लढाऊ विमानावर हल्ला केला आहे. तसेच एका लष्करी तळाला उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तर कंबोडियाने देखील हल्ला केला आहे. कंबोडियने केलेल्या हल्ल्यात थायलंडचे पेट्रोल पंप उद्ध्वस्त झाले आहे. BM-21 रॉकेटने हल्ला करण्यात आला असून यानंतर बॅंकॉकमध्ये खळबळ उडाली आहे.

  • 24 Jul 2025 03:38 PM (IST)

    24 Jul 2025 03:38 PM (IST)

    महाराष्ट्रासह ‘या’ दोन राज्यांत अतिवृष्टी होणार; तुफान पाऊस कोसळणार, IMD ने दिला रेड अलर्ट

    देशात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पर्वतीय भागातील राज्ये, दक्षिण भारतातील काही राज्यांत , मध्य महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु आहे. राजधानी दिल्लीपासून राजस्थानपर्यंत मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आजही हवामान विभागाने काही राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

  • 24 Jul 2025 03:30 PM (IST)

    24 Jul 2025 03:30 PM (IST)

    महाराष्ट्रासह ‘या’ दोन राज्यांत अतिवृष्टी होणार; तुफान पाऊस कोसळणार, IMD ने दिला रेड अलर्ट

    नवी दिल्ली: देशात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पर्वतीय भागातील राज्ये, दक्षिण भारतातील काही राज्यांत , मध्य महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु आहे. राजधानी दिल्लीपासून राजस्थानपर्यंत मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आज हवामान विभागाने कोणत्या राज्यांना अलर्ट दिला आहे ते जाणून घेऊयात.

  • 24 Jul 2025 03:28 PM (IST)

    24 Jul 2025 03:28 PM (IST)

    सरसंघचालक मोहन भागवतांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत High Level बैठक

    यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरे करत आहे. शंभर वर्षे पूर्ण होणार असल्याने संघ देशातील प्रत्येक भागात आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मसुलीम धर्मगुरुंमध्ये महत्वाची बैठक पार पडली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीमधील हरियाणा भवनमध्ये मुस्लिम धमर्गुरूंसोबत बैठक केली आहे.

  • 24 Jul 2025 03:20 PM (IST)

    24 Jul 2025 03:20 PM (IST)

    'आम्ही निवडणूक आयोगाला सोडणार नाही'; बिहार मतदार यादीवरून राहुल गांधींचा इशारा

    मतदार यादी फेरपडताळणीवरून बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उपटत आहेत. मतदारार यादी फेरपडताळणीवरून विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस खूप आक्रमक झाला असून राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगाला कठोर शब्दात इशारा दिला आहे.

  • 24 Jul 2025 03:00 PM (IST)

    24 Jul 2025 03:00 PM (IST)

    रशियात मोठी विमान दुर्घटना, ५० जणांचा मृत्यू

    पुन्हा विमानाची मोठी दूर्घटना घडली असून रशियन प्रवासी विमान गुरुवारी (२४ जुलै) बेपत्ता झाले होते. परंतु आता विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या प्रवासी विमानात ५० प्रवासी होते. अंगारा एअरलाइन्सचे विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते, परंतु त्यांचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. आता रशियन माध्यमांनी दावा केला आहे की विमानाचे अवशेष सापडले आहेत.

  • 24 Jul 2025 02:53 PM (IST)

    24 Jul 2025 02:53 PM (IST)

    अहान पांडे आणि अनित पड्डा बनले IMDb चे टॉप लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी

    ‘सैयारा’ चित्रपटाची क्रेझ खूप वाढत आहे. ‘सैयारा’च्या चाहत्यांचे असे व्हिडिओ थिएटरमधून येत आहेत, जे या वर्षी यापेक्षा चांगला चित्रपट प्रदर्शित झाला नाही आणि प्रदर्शित होऊ शकत नाही हे सिद्ध करत आहेत. या चित्रपटाने 6 दिवसांत 153 कोटी रुपये कमाई केली आहे. दुसरीकडे, या चित्रपटाचे शीर्षक गीत नवीन विक्रम करत आहे. चित्रपटाची कथा असो, स्टारकास्ट असो किंवा संगीत असो, सर्व काही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. दरम्यान, आता आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे.

  • 24 Jul 2025 02:52 PM (IST)

    24 Jul 2025 02:52 PM (IST)

    मूर्ती विसर्जनाबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

    २५ जुलै पासून श्रावण महिन्याला सुरुवात होता आहे. श्रावण संपताच गणेशोत्सवाचा तयारीला सगळे लागतात. बाप्पांची आकृती बनवायला सुरवात झाली आहे. बाप्पाचं विसराजां झालं की नवरात्रीची सुरवात होते. याकाळात हिंदू परंपरा आणि निसर्ग, वातावरण जपणं हे सर्वात महत्वाचं असणार आहे. यासाठी राज्यसरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता गणेशोत्सव आणि नवरात्रीतील मूर्ती विसर्जनाबाबत राज्य सरकारने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील गणेशमंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊया काय आहे निर्णय?

  • 24 Jul 2025 02:51 PM (IST)

    24 Jul 2025 02:51 PM (IST)

    कोयना धरणांतर्गत पावसाचा जोर वाढला

    पाटण : कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडत आहे. छोट्या नद्या, नाले, ओढ्यांमधून प्रतिसेकंद सरासरी १६ हजार ३८१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणाच्या एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता ७६.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे २८.४४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

  • 24 Jul 2025 02:50 PM (IST)

    24 Jul 2025 02:50 PM (IST)

    BDL च्या ‘या’ स्पेशल भरतीविषयी जाणून घ्या

    भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) मध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. ट्रेनी ऑफिसर, ट्रेनी असिस्टंट आणि ट्रेनी इंजिनिअर पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना bdl.india.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज १० ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. २१२ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

  • 24 Jul 2025 02:50 PM (IST)

    24 Jul 2025 02:50 PM (IST)

    AI गिळून टाकणार ‘या’ लोकांची नोकरी!

    अलिकडच्या काळात, जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात AI चा वापर दिसून येत आहे. AI च्या आगमनाने, अनेक लोकांना काळजी वाटते आहे की त्यांच्या नोकऱ्या त्यामुळे जाऊ शकतात, तर काही लोकांना AI मुळे आधीच गमवाव्या लागल्या आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा ChatGPT चे मालक असे काही बोलले आहेत ज्यामुळे लाखो लोकांचा ताण वाढला आहे. खरं तर, OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी अलीकडेच वॉशिंग्टनमध्ये झालेल्या फेडरल रिझर्व्ह परिषदेत सांगितले की कृत्रिम बुद्धिमत्ता कामाच्या ठिकाणी कसा बदल करत आहे.

  • 24 Jul 2025 02:27 PM (IST)

    24 Jul 2025 02:27 PM (IST)

    ठेकेदाराने महानगरपालिकेला लावला लाखोंचा चुना

    कोल्हापूर : कोल्हापुरात एका ठेकेदाराने महानगरपालिकेला लाखोंचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्ष काम न करता कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून ठेकेदारानं ८५ लाखाचं बिल मिळवल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराने देखील आपण खोट्या सह्या आणि कागदपत्रांचा वापर करून हे बिल मिळवलं असल्याच कबुल केलं आहे. या प्रकारामुळे मात्र महानगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • 24 Jul 2025 02:27 PM (IST)

    24 Jul 2025 02:27 PM (IST)

    केएल राहुलचा मोठा पराक्रम!

    भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. हा सामना २३ जुलैपासून सुरु झाला आहे. बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारत फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारताची सलामीवीर जोडी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी केली आहे. पहिला दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ४ विकेट्स गमावून २६४ धावा केल्या होत्या. रवींद्र जडेजा(१९) आणि शार्दूल ठाकुर(१९) धावांवर नाबाद आहेत. या दरम्यान भारताचा सलामीवीर केएल राहुलने एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चेतेश्वर पुजाराला पिछाडीवर टाकले आहे.

  • 24 Jul 2025 02:26 PM (IST)

    24 Jul 2025 02:26 PM (IST)

    अमेरिकन नौदलाच्या जहाजाला इराणची चेतावणी

    तेहरान : अमेरिका आणि इराणमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. अमेरिकेच्या इस्रायलला पाठिंब्याने आणि इराणच्या अणु केंद्रावरील हल्ल्याने संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणने बुधवारी २३ जुलै रोजी एक मोठा दावा केला आहे. इराणने म्हटले आहे की, त्यांनी अमेरिकन नौदलाच्या विध्वंसक जहाज यूएसएस फिट्झगेरला मार्ग बलदण्यास भाग पाडले. मात्र, अमेरिकेने इराणच्या या दाव्याला फोटाळून लावले आहे. सध्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

  • 24 Jul 2025 02:26 PM (IST)

    24 Jul 2025 02:26 PM (IST)

    काचेसारख्या नितळ पांढऱ्या शुभ्र त्वचेसाठी तांदळाच्या पिठात मिक्स करा ‘हे’ पदार्थ

    सर्वच महिलांना आपली त्वचा गोरी आणि चमकदार असावी, असे नेहमीच वाटत असते. त्वचा सुंदर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले फेसपॅक, फेसमास्क किंवा फेस सीरम लावून त्वचेची काळजी घेतली जाते. या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेवर काही दिवसांमध्येच चमकदार ग्लो येऊन चेहऱ्याचा रंग हळूहळू बदलू लागतो. अपुऱ्या झोपेमुळे आणि बिघडलेल्या पचनक्रियेमुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कितीही उपाय केले तरीसुद्धा कमी होत नाहीत. पिंपल्स गेल्यानंतर त्याचे डाग कायमच चेहऱ्यावर तसेच राहतात. त्वचेचा सावळा रंग आणखीनच गोरा करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. या ट्रीटमेंट केल्यामुळे काही काळच त्वचा अतिशय चमकदार आणि ग्लोइंग दिसते. मात्र पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.

  • 24 Jul 2025 02:25 PM (IST)

    24 Jul 2025 02:25 PM (IST)

    हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावर आव्हाडांचे टीकास्त्र

    मुंबई : सांगलीमधील एका तरुणाने सरकारकडून पैसे न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहे. वाळवा तालुक्यामध्ये सरकारच्या थकबाकीने एका तरुणाचा जीव घेतला आहे. शासकीय कंत्राटदार असलेल्या हर्षल पाटील याने कोट्यवधी रुपये न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहे. हर्षल पाटील याने सरकारने पैसे थकवल्यामुळे कंटाळून जीव दिला आहे. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे या तरुणाचा जीव गेल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरुन शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

  • 24 Jul 2025 02:25 PM (IST)

    24 Jul 2025 02:25 PM (IST)

    राष्ट्रीय महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा

    महमार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे. गणेशोत्सवाचा सण तोंडावर आला असताना देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांचा सामना करूनच रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. याची प्रचिती यावर्षीही दिसत असून वडखळ नाक्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. वडखळ नाका म्हणजे कायमच मोठ मोठ्या गाड्यांची वाहतूक सुरु असते. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याला मोठ्य़ा प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरु आहे. प्रशासनाला प्रवाशांना होणारा त्रास दिसतच नाही की दिसूनही डोळे झाक केली जात आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • 24 Jul 2025 01:55 PM (IST)

    24 Jul 2025 01:55 PM (IST)

    भारत रोखणार का विनाशकारी युद्ध? इस्रायल अन् हमासच्या वाद थांबवण्यासाठी सांगितला ‘हा’ राजमार्ग

    गाझातील इस्रायल आणि हमास युद्धाने तीव्र रुप धारण केले आहे. गाझामध्ये अनेक अमानवीय कृत्य घडत आहे. इस्रायलच्या कारवायांमुळे गाझातील पॅलेस्टिनी लोकांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान या युद्धावर भारताने पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNSC) आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या या विधानेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. भारताने गाझातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

  • 24 Jul 2025 01:43 PM (IST)

    24 Jul 2025 01:43 PM (IST)

    Bonds मध्ये ऑनलाइन गुंतवणूक करताय?एनएसई आणि बीएसईच्या ‘या’ सूचना वाचा

    जर तुम्ही ऑनलाइन बाँड प्लॅटफॉर्मद्वारे कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) ने गुंतवणूकदारांना कोणत्याही बाँडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे क्रेडिट रेटिंग, जोखीम आणि संभाव्य परतावा पूर्णपणे समजून घेण्याचा इशारा दिला आहे. जर गुंतवणूकदारांनी हे पैलू योग्यरित्या समजून घेतले नाहीत तर ते चुकीचे निर्णय घेऊ शकतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. म्हणून, गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे.

  • 24 Jul 2025 01:40 PM (IST)

    24 Jul 2025 01:40 PM (IST)

    ‘पुष्पा २’ आणि ‘अ‍ॅनिमल’ला दिली टक्कर, ‘Saiyaara’ ने रचला इतिहास, बनवला नव्या रेकॉर्ड

    अहान पांडे आणि अनित पद्ढा यांचा ‘सैय्यारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज कमाई करून निर्मात्यांचे खिस्से भरत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. तथापि, असे बरेच लोक आहेत ज्यांना हा चित्रपट फारसा आवडला नाही आणि ते मोहित सुरीला ट्रोल करत आहेत. या सर्वांमध्ये, ‘सैय्यारा’ने आणखी एक विक्रम नोंदवला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ आणि रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ नंतर, मोहित सुरीच्या ‘सैय्यारा’ने सुट्टी नसलेल्या दिवशी सर्वाधिक कमाई करून नवा रेकॉर्ड मिळवला आहे.

  • 24 Jul 2025 01:35 PM (IST)

    24 Jul 2025 01:35 PM (IST)

    सपाट सुरुवातीनंतर शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स 170 अंकांनी कोसळला

    जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही गुरुवारी (२४ जुलै) भारतीय शेअर बाजार सपाट उघडले. आठवड्याच्या समाप्ती आणि वाढत्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. याशिवाय, आयटी शेअर्समधील घसरणीमुळे ब्रिटनसोबतच्या संभाव्य मुक्त व्यापार कराराबद्दल (एफटीए) आशावाद कमी झाला.आज, शेअर बाजाराची हालचाल अनेक महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असू शकते. यामध्ये कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल, जुलैमधील उत्पादन पीएमआय फ्लॅश डेटा, निफ्टी एफ अँड ओ एक्सपायरी, जागतिक बाजारातील संकेत यासारख्या घटकांचा समावेश आहे.

  • 24 Jul 2025 01:33 PM (IST)

    24 Jul 2025 01:33 PM (IST)

    जलजीवनाने घेतला ‘जीव’! सरकारने पैसे न दिल्याने कंत्राटदार तरुणाने केली आत्महत्या

    वाळवा तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. सरकारच्या थकबाकीने एका तरुणाचा जीव घेतला आहे. शासकीय कंत्राटदार असलेल्या हर्षल पाटील याने आत्महत्या केली आहे. त्याने सरकारने पैसे थकवल्यामुळे कंटाळून जीव दिला आहे. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे या तरुणाचा जीव गेल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

  • 24 Jul 2025 01:15 PM (IST)

    24 Jul 2025 01:15 PM (IST)

    लाडकी बहीण योजनेचा त्याग करणार’; वाईतील महिलांचा इशारा

    वाईतील लॉंग मार्चचा आठवा दिवस सुरु आहे. या आठव्या दिवशीही कुसगाव, एकसर, व्याहळी आणि बोरीव या गावांतील असंख्य महिला आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत. या महिलांनी सरकारविरोधी एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचा निर्धार केला आहे.ज्या राज्य शासनाला मागच्या आठ दिवसांमध्ये आमची थोडीही दया आली नाही, ज्यांना आमच्या डोळ्यातील अश्रू, आम्हाला होणारा त्रास दिसला नाही ते सरकार आम्हाला न्याय देऊन आमचा सन्मान करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणारा सन्मान निधी नको, असा निर्धार महिलांच्या वतीने करण्यात आला.

  • 24 Jul 2025 01:10 PM (IST)

    24 Jul 2025 01:10 PM (IST)

    ५० प्रवाशांना घेऊन जाणारे रशियन विमान बेपत्ता

    १२ जून २०२५ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान एआय-१७१ च्या भीषण अपघातात ५२ ब्रिटिश नागरिकांसह २६० जणांचा मृत्यू झाला. हा अपघात भीषण अपघात अद्याप कोणी विसरु शकला नाही. अशातच आता रशियनमधून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. रशियाचे एक प्रवासी विमान बेपत्ता झाले असून ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाशी हवाई वाहतूक नियंत्रकांचा संपर्क तुटला आहे. सध्या विमानाचा शोध घेतला जात आहे, परंतु आतापर्यंत त्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

  • 24 Jul 2025 12:58 PM (IST)

    24 Jul 2025 12:58 PM (IST)

    सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात कामकाज सुरू असताना रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र मला रमी खेळताच येत नाही, काही जणांनी विनाकारण माझी बदनामी केली, असा आरोप करत कोकाटे यांनी चौकशीची मागणी केली आहे. तसंच यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावरुन आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

  • 24 Jul 2025 12:55 PM (IST)

    24 Jul 2025 12:55 PM (IST)

    यति नरसिंहानंदांविरोधात कारवाईची मागणी

    उत्तर प्रदेशातील हिंदू सेनेचे अध्यक्ष यति नरसिंहानंद उर्फ यतिराज संत यांनी शिर्डीतील साईबाबांविरोधात अपमानकारक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या विधानामुळे महाराष्ट्रासह देशभरातील साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.

  • 24 Jul 2025 12:45 PM (IST)

    24 Jul 2025 12:45 PM (IST)

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन

    शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आज मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जोरदार चक्काजाम आंदोलन छेडले. गुजरात दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर हे आंदोलन करण्यात आले... राज्यभरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, विशेषतः पूर्ण कर्जमाफी, या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे..पक्षाने इशारा दिला आहे की, सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल.

  • 24 Jul 2025 12:35 PM (IST)

    24 Jul 2025 12:35 PM (IST)

    माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

    माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत यांच्या कुटुंबियांनी शेतकऱ्यांचे तब्बल ८ कोटी १६ लाख रुपयांचे ऊस बिल थकवल्याचा आरोप ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी केला आहे. तेरणा, शिवशक्ती आणि सोनारी या तिन्ही कारखान्यांचा कारभार तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत करत असल्याचं बोललं जातं आहे. शेतकऱ्यांचे पैसे तत्काळ द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा ठाकरे सेनेने दिला आहे.

  • 24 Jul 2025 12:30 PM (IST)

    24 Jul 2025 12:30 PM (IST)

    चंद्रपूर – नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारच्या वतीने चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील टेमुर्डा गावात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. प्रहारचे नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्व आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांचे सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

  • 24 Jul 2025 12:21 PM (IST)

    24 Jul 2025 12:21 PM (IST)

    हर्षल पाटील यांच्या आत्महत्येचा संदर्भात सांगली जिल्हा परिषदेचा खुलासा

    हर्षल पाटील यांनी सांगली जिल्ह्या अंतर्गत जलजीवन मिशन चा काम घेतल नाही आहे त्यासंदर्भात कोणताच करारनामा झाला नाही आहे. माध्यमांमध्ये आलेल्या या बातम्या खोट्या आहेत असा खुलासा सांगली जिल्हा परिषदेने केला आहे.

  • 24 Jul 2025 12:18 PM (IST)

    24 Jul 2025 12:18 PM (IST)

    SIR विरोधात संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

    बिहार निवडणुकीपूर्वी जोरदार राजकारण तापले आहे. बिहारमधील मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी एसआयआर (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) च्या विरोधात निदर्शने केली आहेत. संसदेच्या पायऱ्यांवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह विरोधातील नेते आंदोलन करत आहेत.

    INDIA गठबंधन के सांसदों ने SIR (Special Intensive Revision) के नाम पर बिहार में हो रही वोट चोरी के खिलाफ प्रदर्शन किया।

    📍संसद परिसर, दिल्ली pic.twitter.com/lMaeJdGRBe

    — Congress (@INCIndia) July 24, 2025

  • 24 Jul 2025 12:14 PM (IST)

    24 Jul 2025 12:14 PM (IST)

    अनिल अंबानींच्या मागे ED चा ससेमिरा

    उद्योगजक अनिल अंबानी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरु झाला आहे. त्यांच्याशी संबंधित 50 कार्यालयावर छापे पडले आहेत. यामुळे अनिल अंबानी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

  • 24 Jul 2025 11:51 AM (IST)

    24 Jul 2025 11:51 AM (IST)

    मुंबई साखळी बॉम्बस्फोटच्या हाय कोर्ट निर्णयाला स्थगिती

    मुंबई साखळी बॉम्बस्फोट झालेल्या सर्व 12 आरोपींची मुंबई हाय कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. फाशीची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींना थेट तुरुंगातून सोडवल्यामुळे रोष व्यक्त होतोय. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आता बॉम्बे हाय कोर्टाच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

  • 24 Jul 2025 11:49 AM (IST)

    24 Jul 2025 11:49 AM (IST)

    सरकारी कामाचे पैसे न मिळाल्याने तरुणाने संपवले जीवन

    सांगली जिल्‌ह्यातील तांदुळवाडी या गावचा रहिवासी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हर्षल यांनी सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचे काम पूर्ण केले. मात्र, कंत्राटाचे पैसे न मिळाल्‌यामुळे व त्या कामासाठी घेतलेल्या कर्जामुळे हर्षल यांनी आयुष्य संपवले आहे. यामुळे सरकारवर टीका केली जात आहे.

  • 24 Jul 2025 11:24 AM (IST)

    24 Jul 2025 11:24 AM (IST)

    संभाजी ब्रिगेडच्या माजी पदाधिकाऱ्यांना चपलेने मारहाण

    अकोल्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी यांना एका महिलेने चपलेने मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असला तरी देखील ही घटना जुनी आहे. महिलेसोबत गैरवर्तन केल्याने ही मारहाण केल्याचे बोलले जात आहे.

  • 24 Jul 2025 11:21 AM (IST)

    24 Jul 2025 11:21 AM (IST)

    अनिल अंबानींच्या ५० ठिकाणी छापे

    ईडीने अनिल अंबानींच्या ४८ ते ५० ठिकाणी छापे टाकले आहेत. ही छापेमारी दिल्ली आणि मुंबईत करण्यात आली आहे.

Web Title: Top marathi news today political update sports update cultural update breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 09:10 AM

Topics:  

  • navarashtra breaking

संबंधित बातम्या

Explainer: 4 वर्षात 4 शेजारी देशात सरकारी भवनात घुसून सत्तापालट, जनतेच्या आक्रोशाने पालटले चित्र
1

Explainer: 4 वर्षात 4 शेजारी देशात सरकारी भवनात घुसून सत्तापालट, जनतेच्या आक्रोशाने पालटले चित्र

Top Marathi News Today: रेव्ह पार्टीच्या कारवाईनंतर रोहिणी खडसे यांचा आक्रमक पवित्रा
2

Top Marathi News Today: रेव्ह पार्टीच्या कारवाईनंतर रोहिणी खडसे यांचा आक्रमक पवित्रा

Top Marathi News Today : सोने-चांदीच्या दरात चढउतार सुरूच; 10 ग्रॅम सोन्याचा दर पोहोचला…
3

Top Marathi News Today : सोने-चांदीच्या दरात चढउतार सुरूच; 10 ग्रॅम सोन्याचा दर पोहोचला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.