
TTD: 2025 सालची पहिली एकादशी, दर्शनासाठी मिळणार स्पेशल तिकीट; बुकींग आणि खर्चाबाबतची माहिती एका क्लिकवर
हिंदू धर्मात भगवान श्री कृष्णांना विश्वाचा पालन कर्ता म्हणतात. म्हणून एकादशीला हिंदू घर्मात मोठं महत्त्व प्राप्त आहे. अशीच एक एकादशी म्हणजे वैकुंठ एकादशी. येत्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2025मध्ये वैकुंठ एकादशी आहे. या दिवशी तामिळनाडू येथील श्री क्षेत्र तिरुपती येथे भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी ऑनलाईन तिकिट बुकींगची सुविधा सुरु केली आहे. वैष्णव संप्रदातील बहुसंख्य भाविकांसाठी तिरुपती देवस्थान विश्वस्तांनी 23 डिसेंबरपासून दर्शनासाठी ऑनलाईन तिकिट विक्रीची सुविधा केली आहे. 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता विशेष प्रवेश दर्शन ऑनलाइन तिकिट उपलब्ध होतील. भाविक तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या (TTD) च्या अधिकृत वेबसाइटवरून आपली तिकीटे बुक करू शकतात असं देवस्थानच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आलं आहे.
वैकुंठ एतकादशीला भाविक मोठ्या संख्येने बालाजीच्या सोहळ्याकरीता येत असतात त्यामुळे त्यांचं योग्य रितीने व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. म्हणूनच टोकन 8 केंद्रांवर तिरुपती आणि 1 केंद्र तिरुमाळावर वितरित केले जातील. वैकुंठ द्वार हा भक्तीच्या वाटेकडे नेते अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून खास वैकुंठ एकादशी निमित्त हा द्वार उघडण्यात येतो.
भक्तांच्या मोठ्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी, स्लॉटेड सर्व दर्शन (SSD)टोकन 8 केंद्रांवर तिरुपती आणि 1 केंद्र तिरुमाळावर वितरित केले जातील. वितरण केंद्रांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
तिरुपती: MR पल्लि, जीवाकोंना, रामणैदू स्कूल, रामचंद्र पुष्करिणी, इंदिरा मैदान, श्रीनिवासम, विष्णू निवासम, भूदेवी कॉम्प्लेक्सतिरुमालाकौस्तुभम गेस्टहाऊस इथे राहण्याची सोय केली जाईल. टीटीडीच्या मुख्य अभियंते यांनी या केंद्रांवर सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांची गर्दी होऊन कोणत्याही प्रकारे इजा होऊ नये यासाठी केवळ टोकन असलेल्यांनाच वैकुंठ द्वार दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. असं देवस्थान संस्थेने सांगितलं आहे. टोकन न असलेल्या व्यक्तींना तिरुमाळा भेट देण्याची परवानगी असली तरी, त्यांना दर्शन रांगेत प्रवेश मिळणार नाही.
– वैकेंठ एकादशी दिवस (10 जानेवारी 2025): VIP प्रोटोकॉल दर्शन सकाळी 4:45 वाजता सुरु होईल.
– एक भव्य सुवर्ण रथ मिरवणूक सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत होईल.
– द्वादशी दिवस (11 जानेवारी 2025): श्रीवारी पुष्करिणीत चक्रस्नान विधी सकाळी 5:30 ते 6:30 वाजेपर्यंत पार पडेल.
भक्तांसाठी सोयीसुविधा (TTD)ने महोत्सवादरम्यान अपेक्षित मोठ्या संख्येने भक्तांसाठी भरपूर सोयीसुविधा तयार केली आहेत:
– फुकट जेवण वितरण (अन्नदान):सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत, अन्नदानमध्ये चहा, कॉफी, दूध, उपमा, साखरेचे पोंगल आणि पोंगल सेवा केली जाईल.
-लाडूंचे वाटप : लाडूंचा 3.5 लाखांचा बफर स्टॉक ठेवला जाईल.
– वाहतूक व्यवस्थापन: स्थानिक पोलिसांबरोबर समन्वय साधून टीटीडीने मंदिराजवळ वाहतुकीची व्यवस्था केली आहे.
वैकेंठ एकादशी हा एक अत्यंत पवित्र आणि मान्यताप्राप्त महोत्सव आहे, ज्यात देशभरातील लाखो भक्त तिरुमाळाला येतात. वैकेंठ द्वारातून जाण्याचा दिव्य अनुभव आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आणि भाग्यशाली मानला जातो. टीटीडीच्या तिकीट बुकिंग, दर्शन व्यवस्थापन आणि सुविधांच्या सुयोग्य तयारीसह, भक्तांना या महोत्सवाच्या दरम्यान एक आनंददायी अनुभव मिळवता येईल. असं तिरुपती देवस्थान संस्थेने विश्वास व्यक्त केला आहे.
.