पोखरिया पीर परिसरातील उमेश शहा आणि पप्पू राम यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तर अन्य दोन लोक धर्मेंद्र आणि राजू यांचीही दृष्टी गेली असल्याची माहिती आहे
मुझफ्फरपूर: बिहारमध्ये दारुबंदी (Liquor Ban In Bihar) करुनही शासन निर्णयाला लोकांनी केराची टोपली दाखवल्याचं दिसत आहे. दारुच्या हव्यासापोटी मुझफ्फरपूर जिल्ह्यात संशयास्पद विषारी दारू प्यायल्याने (Poisonous Liquor) दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जणांची दृष्टी गेली. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून दारू पुरवठादाराच्या घरी धाड टाकली मात्र, तो फरार होण्यात यशस्वी झाला तर त्याची पत्नी आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.
[read_also content=”सणासुदीच्या दिवसात रेल्वेची 11 राज्यांना भेट, नऊ वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा! https://www.navarashtra.com/india/pm-narendra-modi-flag-off-nine-news-vande-bharat-express-nrps-461266.html”]
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी मुझफ्फरपूरच्या पोखरिया पीर परिसरातील तीन चार जण दारू पिऊन घरी परतल्यानंतर आजारी पडले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
दोघांचा मृत्यू, दोघांची दृष्टी गेली
उमेश शहा (वय 50 वर्षे) आणि पप्पू राम (वय 32 वर्षे) या परिसरातील नागरिकांचा मृत्यू झाला. तर काझी मोहम्मदपूर येथील 25 वर्षीय राजू साह आणि 26 वर्षीय धर्मेंद्र कुमार यांची दृष्टी गेली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. या संपूर्ण घटनेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. एका आजारी व्यक्तीने सांगितले की, त्याने दोन ग्लास दारू प्यायली, त्यानंतरच त्याची तब्येत बिघडू लागली.
बिहार सरकारने २०१६ मध्ये मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती
2016 मध्ये नितीश कुमार सरकारने बिहारमध्ये दारूविक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती. मात्र, अशा बातम्यांमुळे बिहार सरकारचे दावे उघड फोल ठरत आहेत.
Web Title: Two died and two lost eyesight after drinking poisonous liquor in bihar nrps