मार्च 2022 नंतर इंडिगोच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण, शेअर 13 टक्क्यांनी आपटला! वाचा... सविस्तर
दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात एक मद्यधुंद व्यक्तीने एका महिलेवर लघुशंका केल्याची घटना ताजी असताना आता इंडिगोच्या विमानात असात एक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली-पाटणा फ्लाइटमध्ये दोन प्रवाशांनी मद्यधुंद होऊन प्रचंड गोंधळ घातल्याचा आरोप आहे. दोन्ही आरोपींना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. आता त्यांना न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू आहे.
[read_also content=”उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळावर संकट! कुठं भूस्खलन, तर कुठं जमिनीतून येतयं पाणी, राहतं घर सोडण्याची लोकांवर वेळ https://www.navarashtra.com/photos/joshimath-crises-landslide-in-joshimath-water-comes-from-the-ground-nrps-360268.html”]
विमानात राडा होण्याच्या घटना काही थांबताना दिसत नाही आहेत. दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E-6383 मध्ये दोन प्रवासी चढले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रवासी मद्यधुंद अवस्थेत दिल्ली विमानतळावरून चढले होते. विमानात असताना त्याने एअर होस्टेस आणि पायलटसोबत गैरवर्तन केले. रात्री 9.00 च्या सुमारास विमान पाटणा येथे उतरले. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर आरोपींना सीआयएसएफकडे, त्यानंतर पाटणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रोहित कुमार आणि नितीन अशी आरोपींची नावे आहेत.
नुकतेच 5 जानेवारी रोजी गोवा-मुंबई फ्लाइटमध्ये क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. क्रू मेंबरसह दोन परदेशी नागरिकांनी ही घटना घडवली होती. दोघांनाही गोव्यातच (टेक ऑफ करण्यापूर्वी) सोडण्यात आले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. विमान कंपनीने या प्रकरणाची माहिती डीजीसीएला दिली होती.
याआधी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर २०२२ रोजी फ्लाइटमधील गैरवर्तनाचे प्रकरण समोर आले होते. ही महिला बिझनेस क्लासमध्ये एआय १०२ या फ्लाइटमधून न्यूयॉर्कहून दिल्लीला जात होती. दुपारच्या जेवणानंतर दिवे बंद होते, तेव्हा आरोपी शंकर मिश्रा या वृद्ध महिलेच्या सीटजवळ आला आणि तिच्या अंगावर लघवी केली, असा आरोप आहे. दोन्ही पक्षांमधील व्हॉट्सअॅप मेसेजच्या आधारे, आरोपीच्या वकिलांनी दावा केला होता की महिलेचे कपडे आणि बॅग 30 नोव्हेंबरला स्वच्छ करून करण्यात आले तसेच. आरोपीच्या म्हणण्यानुसार, महिलेने शंकरला माफ केले होते आणि त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नंतर या प्रकरण पुन्हा वर आले आणि आरोपीवर कारवाई करण्यात आली. तर, दुसरीकडे ज्या अमेरिकन कंपनीत आरोपी व्हाईस प्रेसिडेंटसारख्या मोठ्या पदावर काम करत होता, त्या कंपनीनेही त्याला कामावरून काढून टाकले आहे.