नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी ११ वाजता मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करणार आहेत. अर्थसंकल्पसादर सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण संसदेच्या दिशेने रवाना झाल्या हेत. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सीतारामन यांच्यासोबत जी टीमने काम केले त्या टीमसह फोटोसेशन करण्यात येईल. त्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची मंजुरी घेण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी जातील, अशीही माहिती मिळाली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तरतूद करण्यात आल्याचे संकेत निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सूक्ष्म आणि लघु उद्योगांना काय मिळणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
देशाच्या आर्थिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही बाब लक्षात घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात या उद्योगांसाठी भरीव तरतूद केल्याचे सांगितले जात आहे. तसेच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSMEs) वृद्धीसाठी केंद्र सरकारकडून योग्य निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तंत्रज्ञान आणि योग्य प्रशिक्षण यांवरही भर दिला जाणार आहे.
त्यासोबतच, पायाभूत सुविधांच्या विकासावरही केंद्र सरकारने भर दिला असून त्यासाठी ११.१ लाख कोटी रुपये संभाव्य खर्च आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत हा खर्च वाढल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने काय तरतूदी केल्या आहेत, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.