उत्तर प्रदेश: देशभरात हिंदू-मुस्लिम राजकारण शिगेला पोहचले असतानाच उत्तरप्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील जेहानाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदू तरूणीचे अपहरण करणाऱ्या एका मुस्लिम तरूणाला युपी पोलिसांनी अटक केली आहे. इन्साफ ऱाजा असे या तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2021 साली इन्साफ राजाने एका तरूणीचे अपहरण केले होते. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. पण तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा हिंदू तरूणीच्या अपहरण केले. जबरदस्तीने लग्नासाठी तिला धमक्या देणं सुरू केले. धक्कादायक म्हणजे, तरूणीचे अपहरण करण्यापूर्वी इन्साफ राजाने तरूणीच्या कुटुंबियांना 2021 चा खटला मागे घ्या आणि इस्लाम धर्म स्वीकारा, अन्यथा आपण संपूर्ण कुटुंबाला बॉम्बने उडवून देऊ, असा आरोप पिडीत तरूणीच्या कुटुंबियांनी केली आहे.
Todays Gold Price: सोन खरेदीदारांसाठी मोठी बातमी! ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण
या घटनेची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी आठवडाभरापूर्वी डीएमकडे केली होती, त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. आरोपी इन्साफला निष्क्रिय बॉम्बसह अटक करण्यात आली. जेहानाबाद पोलिसांनी सांगितले की, बेहनोटा कोडा जेहानाबाद येथील रहिवासी इस्लामचा मुलगा इन्साफ राजा याच्याविरुद्ध बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा हिंदू कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्यांना धमक्या दिल्या. पोलिसांच्या पथकाने पिडीत तरूणी, इन्साफ आणि बॉम्बसह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाकडून 315 बोअरचे एक पिस्तूल, 315 बोअरचे एक जिवंत काडतूस आणि दोन देशी बनावटीचे बॉम्ब जप्त केले आहेत.
पीडित तरूणीच्या आईचे तरूणावर गंभीर आरोप केले आहेत. सहा दिवसांपूर्वी आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून एसपींना एक अर्ज देच आणि आरोप केला होता. 2021 मध्ये आपल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे 2021 मध्ये परिसरातील रहिवासी इन्साफ उर्फ राजा या मुस्लिम तरुणाने त्याच्या साथीदारांसह अपहरण केले होते. आपल्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्याने तिला जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी तिचे अपहरण केले. 2021 मध्ये त्याच्याविरोधात जहानाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
2 डिसेंबरला साजरा केला जातो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस; जाणून घ्या त्याबद्दल काही
मात्र पोलिसांच्या असहकार्यामुळे आरोपी तरूण जामिनावर बाहेर आला. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर इन्साफने आमच्या मुलीलाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबियांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. आरोपी तरुणाला माझ्या मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर करायचे होते. त्यामुळे 9 मे 2022 रोजी कानपूर येथील एका ठिकाणी मुलीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. तो तिथेही पोहचलाआणि त्याने मुलीशी लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरूवात केली. त्याबाबतही आम्ही 23 नोव्हेंबर 2024 रोजी पोलिस ठाण्यात लेखी दिली होती. मात्र पोलिसांनी ऐकले नाही.
याच दरम्यान, आरोपी तरुणाने माझ्या मुलीला फूस लावून तिच्या पतीविरुद्ध कानपूर न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला. ज्याचा निर्णय अद्याप आलेला नाही. 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या मुलीला घेऊन पळून गेला. बाहेर पडताना त्याने इस्लाम धर्म स्वीकारून तिच्याशी लग्न करण्याची धमकी दिल्याचा दावा तरूणीच्या आईने केला आहे. तसेच, 2021 मध्ये दाखल झालेला गुन्हा मागे घेतला नाही, तर तुमच्या मुलीसह सर्वांना ठार मारू, अशी धमकी दिल्याचेही तरूणीच्या आईने म्हटले आहे. मुलगी प्रौढ असल्याने तिचा जबाब घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. त्याच्याकडे कोणीही आले नसल्याचे पोलीस स्टेशन प्रभारींनी सांगितले. थेट पोलीस अधीक्षकांकडे गेले आहेत.
कॅप्टन रोहित शर्माच्या दुसऱ्या कसोटीसाठी जोरदार तयारी! हिटमॅनचे उत्तर जाणून तुम्हाला बसेल
तरूणीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जेहानाबाद पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने 23 सप्टेंबर 2021 रोजी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्या दिवशी सकाळी जेवण करून मी कामाला निघालो. घरी पत्नी आणि दोन मुले होती, दुपारी इस्लामच्या दोन मुली आल्या आणि माझ्या 16 वर्षाच्या मुलीला घेऊन त्यांच्या घरी गेल्या. सायंकाळी घरी आल्यानंतर माहिती मिळताच मी इस्लामच्या घरी गेलो असता, माझा मुलगा इन्साफ उर्फ राजा हा तुमच्या मुलीला चारचाकी वाहनातून घेऊन गेला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.