फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला कसोटी सामना झाला आहे आणि यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामान्यांची कसोटी मालिका आयोजित करण्यात आली आहे. आता भारताचा संघ ६ डिसेंबर रोजी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना होणार आहे. यासाठी सध्या भारताचा संघ ऑस्ट्रेलियालामध्ये कसून सराव करत आहे. आता भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीमध्ये अनुपस्थित असल्यामुळे जसप्रीत बुमराहने कर्णधारपद सांभाळले होते. आता रोहित शर्माचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे. त्यामुळे आता टीम इंडियाची तयारी कशी आहे? यावर कर्णधार रोहित शर्माने प्रत्युत्तर दिले.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
गुलाबी चेंडू डे-नाईट कसोटीपूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळला. मात्र, सराव सामन्याचा पहिला दिवस पावसात वाहून गेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 50-50 असा सामना खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. आता या विजयानंतर रोहित शर्माने सांगितले की, गुलाबी चेंडू कसोटीच्या तयारीने तो खूश आहे. सराव सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “हे विलक्षण होते. एक संघ म्हणून आम्हाला जे हवे होते ते आम्हाला मिळाले. आम्ही संपूर्ण सामना खेळू शकलो नाही हे थोडे दुर्दैवी होते, पण आमच्याकडे मिळालेल्या वेळेचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला. .”
रोहित शर्मा पुढे म्हणाला, “खूप आश्चर्यकारक (गर्दी पाहणे). आम्हाला ऑस्ट्रेलियात यायला आवडते आणि चाहते आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत हे पाहून खूप आनंद झाला. अशी वेळ कधी आली नाही की ते बाहेर आले नाहीत. हे पाहून खरोखर आनंद झाला. ते येतात आणि आम्हाला आनंद देतात.”
Rohit Sharma collected the prime minister’s XI special trophy… 🤍⚡#PMXIvIND #RohitSharma𓃵 #RohitSharma pic.twitter.com/5UKnUqYSF2
— Rohit Sharma (@ROHITSH8795922) December 2, 2024
पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव गुलाबी चेंडू सामन्यात रोहित शर्मा फ्लॉप दिसला हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याच्या बॅटमधून केवळ 11 चेंडूत 03 धावा आल्या. कर्णधाराशिवाय इतर जवळपास सर्वच फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अशा परिस्थितीत टीम इंडिया सराव सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांमध्ये टीम इंडियाची प्लेइंग ११ कशी असेल. कारण भारताच्या संघाने पहिल्या कसोटीमध्ये रोहित शर्माच्या जागेवर केएल राहुलने संघासाठी कमालीची कामगिरी केली होती. त्यामुळे भारताच्या संघासाठी दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी सलामी फलंदाज म्हणून मैदानात कोण उतरणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.