
मृत आईच्या खात्यात जमा झाले 100135600000000000100235600000000299 रुपये
उंची दनकौर येथील रहिवासी २० वर्षीय दीपक कुमार यांनी सांगितले की, त्याची आई गायत्री देवी यांचे सुमारे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. आईच्या कोटक महिंद्रा बँक खात्याशी जोडलेला UPI वापरत होता. सोमवारी संध्याकाळी दीपकला त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला, ज्यामध्ये त्याच्या आईच्या खात्यात ३६ अंकांची मोठी रक्कम जमा झाल्याची माहिती देण्यात आली. ही रक्कम १ अब्ज १३ लाख ५६ हजार कोटी रुपये आहे.
मेसेज पाहून स्तब्ध झालेल्या दीपकने ताबडतोब बँकेत पोहोचून खात्याची माहिती मागितली. मात्र, बँक कर्मचाऱ्यांनी त्याला कोणतीही ठोस माहिती दिली नाही आणि खाते गोठवण्यात आल्याचे सांगितले. बँकेने तातडीने इन्कम टॅक्स विभागाला कळवलं आणि बँक खात्याची चौकशी सुरु केली.
आयकर विभागाने या असामान्य व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. या खात्यात इतकी मोठी रक्कम कुठून आणि कशी आली हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच वेळी, स्थानिक पोलिसांना अद्याप या प्रकरणाची औपचारिक माहिती मिळालेली नाही. कोतवाली प्रभारी सुरेंद्र सिंह म्हणाले, “आम्हाला या प्रकरणाची माहिती नाही. जर अशी कोणतीही घटना घडली असेल तर त्याची चौकशी केली जाईल.”
नोएडा में 20 साल के दीपक के कोटक महिंद्रा बैंक खाते में 36 डिजिट की धनराशि आई है। ये रकम 1 अरब 13 लाख 56 हजार करोड़ रुपए बैठती है। मेरा गणित थोड़ा कमजोर है। बाकी आप लोग गुणा-भाग कर सकते हैं। फिलहाल इनकम टैक्स विभाग जांच कर रहा है। बैंक खाता फ्रीज कर दिया गया है। pic.twitter.com/cLnZdMKozD — Sachin Gupta (@SachinGuptaUP) August 4, 2025
या घटनेची बातमी गावात चर्चा सुरु झाली असून मृत महिलेच्या खात्यात एवढी मोठी रक्कम कशी पोहोचली याबद्दल गावकऱ्यांमध्ये विविध अटकळ बांधली जात आहेत. दीपकने सांगितले की, तो UPI द्वारे पेमेंट करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु व्यवहार अयशस्वी झाला. यानंतर, जेव्हा त्याने खात्यातील शिल्लक तपासली तेव्हा ही आश्चर्यकारक रक्कम समोर आली.
“ग्राहकांच्या खात्यात असामान्यपणे मोठी रक्कम असल्याचे सूचवणारे मीडिया रिपोर्ट चुकीचे आहेत. या रिपोर्ट्सच्या पार्श्वभूमीवर, आम्ही ग्राहकांना कोटकच्या मोबाइल बँकिंग ॲप किंवा नेट बँकिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांच्या खात्याची माहिती तपासण्यास प्रोत्साहित करतो. कोटक महिंद्रा बँक पुष्टी करते की आमच्या सिस्टम सामान्यपणे कार्यरत आहेत, सर्व सेवा सुरक्षित आणि पूर्णपणे कार्यरत आहेत.”
— कोटक महिंद्रा बँक