नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना जगदीप धनखड यांनी दिल्या शुभेच्छा; धनखड यांनी म्हटले...
Jagdeep Dhankhar Health Update: उपराष्ट्रपती जगदीप धनखड (वय 73) यांना छातीत वेदना आणि अस्वस्थता जाणवल्यामुळे रविवारी (९ मार्च २०२५) पहाटे २ वाजता नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जे.पी. नड्डा एम्समध्ये
केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये पोहोचले आहेत. लवकरच त्यांच्या आरोग्यविषयक अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे. धनखड यांच्या उपचारासाठी एम्समध्ये एक विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले असून, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.
उपराष्ट्रपती धनखड यांचा राजकीय प्रवास मोठा आणि महत्त्वाचा राहिला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना त्यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली. त्यांचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत अनेकदा संघर्ष झाला. कडक आणि स्पष्टवक्ते अशी त्यांची प्रतिमा असून, त्यांच्या धडाडीच्या भूमिकेमुळे ते राजकीय चर्चेचा विषय ठरले आहेत.
Indian Railway: ‘या’ रेल्वे प्रवाशांना आता प्लॅटफॉर्मवर नो एन्ट्री! रेल्वेने जाहीर केला मोठा निर्णय