धर्मांतर करवणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा (फोटो- istockphoto)
Madhya Pradesh Government: आज सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये जबरदस्तीने धर्मांतर खवपून घेतले जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिला आहे. हा संपूर्ण विषय काय आहे ते जाणून घेऊयात.
जागतिक महिला दिनानिमित मुख्यमंत्री मोहन यादव बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राज्यात कोणत्याही किंमतीत जबरदस्तीने धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही आणि यासाठी धार्मिक स्वातंत्र्य कायद्यात मृत्युदंडाचीही तरतूद केली जाईल. मध्यप्रदेशचे सरकार या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करेल. जेणेकरून कोणालाही धर्म बदलण्यास भाग पाडले जाऊ नये, धमकावले जाऊ नये किंवा जबरदस्तीने धर्म बदलला जाऊ नये.’
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी महिला सक्षमीकरणासाठी अनेक नवीन योजनांची घोषणा केली. ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 7 दिवसांची रजा आणि कंत्राटी कामगार बहिणींना १८० दिवसांची प्रसूती रजा देण्याची योजनेचा समावेश आहे.
धर्मांतराविरुद्ध मध्यप्रदेश सरकार सतर्क
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी धर्मांतर करवणाऱ्याना मृत्यूदंडाची तरतूद जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. भोपाळमधील अनेक महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि म्हटले की यामुळे मुलींना आमिष दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडल्या जाणाऱ्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. टर कॉँग्रेसने यावर टीका केली आहे. ही तरतूद बनावट असल्याची टीका त्यांनी केली आहे. सरकार कठोर कायदे करते पण त्याची अंमलबाजवणी करत नाही. भाजप प्रवक्ते शिवम शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे समर्थन केले आणि सांगितले की या कडकपणामुळे राज्यात जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटना थांबतील.
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले मोहन यादव आहेत तरी कोण?
58 वर्षीय मोहन यादव यांची राजकीय कारकीर्द 1984 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाल्यानंतर सुरू झाली. ते आरएसएसचे सदस्यही आहेत. 2013 मध्ये त्यांनी उज्जैन दक्षिणमधून निवडणूक लढवली होती आणि सलग तिसऱ्या निवडणुकीत ते येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांचा १२९४१ मतांनी पराभव केला. मोहन यादव यांना ९५६९९ मते मिळाली.
डॉ.मोहन यादव हे भाजपचे अनुभवी नेते
मोहन यादव यांच्या नावाची घोषणा उज्जैनच्या जनतेसाठी आश्चर्यापेक्षा कमी नाही कारण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव कुठेही नव्हते, मात्र विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ते 2004 ते 2010 पर्यंत उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते तर 2011 ते 2013 पर्यंत त्यांनी मध्य प्रदेश पर्यटन विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.