Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Exit Poll 2026: निवडणुकीच्या निकालापूर्वी मुंबईचे सट्टा बाजार गरम! बंगालमध्ये भाजप १७५ पार, तर तामिळनाडूत…

कडक सुरक्षा व्यवस्थेत ३५ जिल्ह्यांमधील ४० मतमोजणी केंद्रांवर ईव्हीएम उघडण्यात आले असून, राज्यातील १२६ विधानसभा जागांवर ७२२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 03, 2026 | 03:40 PM
West Bengal Election Results, Tamil Nadu, Satta Bazar, BJP Bengal Prediction, TVK Vijay,

West Bengal Election Results, Tamil Nadu, Satta Bazar, BJP Bengal Prediction, TVK Vijay,

Follow Us
Close
Follow Us:
  • तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसामसह अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत.
  • सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, पश्चिम बंगालमध्ये यंदा मोठे राजकीय फेरबदल होऊ शकतात.
  • २९४ जागांपैकी भाजप १७५ ते १८५ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवेल, असा दावा सट्टेबाजांकडून केला जात आहे.
  • बहुतेक एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे,
 

 

West Bengal Satta Bazar :  देशात सध्या तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसह तीन राज्यांच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. उद्या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. अशातच देशाच्या अनेक भागांमध्ये अवैध सट्टेबाजी बाजार सक्रिय झाले आहेत. २०२६ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांतील राजकीय समीकरणांवर सट्टा बाजारातील अंदाजांनी चर्चेला उधाण आले आहे.

आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये, बहुतेक एक्झिट पोल भाजपचा विजय दर्शवत आहेत, तर तामिळनाडूमध्ये सर्वांचे लक्ष टीव्हीकेवर आहे. त्यात सट्टेबाजी बाजाराच्या कलांकडेही उत्सुकतेने पाहिले जात आहे, सट्टाबाजारातील निवडणुकांचे कल काय सांगत आहे? सट्टेबाजी बाजार कोणत्या पक्षावर सट्टा लावत आहे, याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी, मुंबईतील सट्टेबाजी बाजार जोरात सुरू आहे. नव्या शक्यता आणि अंदाज असे संकेत देत आहेत, या कलांमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Judge Aman Kumar Sharmaचा संशयास्पद मृत्यू; पुरुषांवरील छळाचा मुद्दा पुन्हा चर्चेत, काय आहेत कायदेशीर हक्क?

बंगालमध्ये भाजप आघाडीवर?

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी (टीएमसी) समोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४ जागा असून बहुमतासाठी १४८ जागांची आवश्यकता आहे. सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भाजप १७५ ते १८५ जागा जिंकू शकते, असा दावा केला जात आहे. हा अंदाज खरा ठरल्यास बंगालमध्ये भाजप ऐतिहासिक विजय नोंदवू शकतो.

दुसरीकडे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीच्या जागा १२७ ते १३२ दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस, सीपीआयएम आणि आयएसएफसारख्या इतर पक्षांची कामगिरी एकेरी आकड्यांपर्यंत मर्यादित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याशिवाय, सट्टा बाजारात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यावर ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा अधिक विश्वास दाखवला जात असल्याचेही सांगितले जात आहे.

तामिळनाडूत डीएमकेचा जोर

दरम्यान, तामिळनाडूत डीएमके यावेळी जोरदार पुनरागमन करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यातील २३४ विधानसभा जागांपैकी डीएमकेला १४५ ते १५५ जागा मिळू शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर एआयएडीएमके’च्या जागा ४५ ते ६५ दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाला ७ ते ९ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बँकांची मनमानी थांबणार! चेक विलंबावर सुप्रीम कोर्टाचा दणका, खाते फ्रीजवर हायकोर्टाची फटकार

आसामच्या मतदारांचा कल कुणाकडे?

आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभरात अस्मितेचे राजकारण, कल्याणकारी योजनांचे वितरण आणि प्रादेशिक आकांक्षा यांवर जोरदार लक्ष केंद्रित करण्यात आले होते. ९ एप्रिल रोजी झालेल्या  एक-टप्प्यातील मतदानात, आसामी मतदार, बंगाली भाषिक आणि आसामी मुस्लिम, चहाच्या मळ्यांतील जमाती आणि स्थानिक आदिवासी गट यांसारखे विविध समुदाय राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील निवडणुकीचे निकाल ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.

कडक सुरक्षा व्यवस्थेत ३५ जिल्ह्यांमधील ४० मतमोजणी केंद्रांवर ईव्हीएम उघडण्यात आले असून, राज्यातील १२६ विधानसभा जागांवर ७२२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, काँग्रेसचे उमेदवार गौरव गोगोई, एआययूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमल आणि रायजोर दलाचे नेते अखिल गोगोई यांचा समावेश आहे.

प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. एजीपी प्रमुख अतुल बोरा हे एनडीएचे प्रमुख सहयोगी आहेत. व्यापक एनडीए चौकटीत प्रादेशिक आसामी राष्ट्रवादाचा प्रभाव अजूनही कायम आहे की नाही, हे एजीपीच्या कामगिरीवरून दिसून येईल. भाजप-एजीपी युतीने विकासाचे राजकारण आणि प्रादेशिक अस्मितेच्या चिंता यांच्यात संतुलन राखण्यावर मोठा भर दिला आहे.

 

Web Title: West bengal exit poll 2026 west bengal tamil nadu election results satta bazar prediction result live exit poll 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 03:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.