फोर्टिफाइड राइस (fortified rice) म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? तर या बातमीतून याच उत्तर जाणून याच उत्तर. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2024 पर्यंत मध्यान्ह भोजनासह सर्व सरकारी योजनांमध्ये फोर्टिफाइड तांदूळ वितरण करण्यास मंजुरी दिली. या योजनेवर सुमारे 4,270 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुलांमध्ये पोषक तत्वांची कमतरता आणि महिलांमध्ये अशक्तपणा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील प्रत्येक दुसरी महिला अशक्त आहे आणि तिसरे मूल अशक्तपणाने ग्रस्त आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून गरजूंना फोर्टिफाइड तांदूळ उपलब्ध करून दिला जाईल. तर मग जाणून फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे काय, ते कसे तयार केले जाते आणि त्याचा किती फायदा होईल?
[read_also content=”चीनने जगभरात जाणीवपूर्वक कोरोना पसरवला; Bioweapon म्हणून वापर केला, वुहानच्या संशोधकानचं केला खुलासा! https://www.navarashtra.com/latest-news/china-deliberately-spread-corona-around-the-world-used-as-bioweapon-wuhan-researchers-reveal-nrps-424255.html”]
फोर्टिफाइड राइस म्हणजे पौष्टिक भात. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) नुसार, जेव्हा अन्नपदार्थात वेगळे पोषक घटक जोडले जातात तेव्हा त्याला फोर्टिफाइड फूड (fortified food) म्हणतात. अशा अन्नातील पोषक घटकांचे प्रमाण वाढते आणि कुपोषण, अशक्तपणा यांसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते.
देशात अनेक तंत्रे आहेत ज्याद्वारे फोर्टिफाइड राइस बनवला जातो. या तंत्रांच्या मदतीने प्रत्येकासाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची संख्या आणि प्रमाण वाढवता येते. कोटिंग, डस्टिंग आणि एक्सट्रूझन यासारख्या तंत्रांचा वापर फोर्टिफाइड भात तयार करण्यासाठी केला जातो.
पहिले पीठ कोरडे तांदूळ दळून बनवले जाते. मग त्यात सूक्ष्म अन्नद्रव्ये जोडली जातात. ते पाण्यात चांगले मिसळले जातात. नंतर यंत्राच्या साहाय्याने हे मिश्रण वाळवून तांदळाचा आकार दिला जातो.
या प्रक्रियामध्ये तांदळावर पोषक तत्वांचा थर दिला जातो. याशिवाय त्यात सूक्ष्म घटक मिसळले जातात, त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने तांदळाचा आकार देऊन ते वाळवले जाते. याला फोर्टिफाइड राइस कर्नल (एफआरके) म्हणतात. तयार केल्यानंतर ते सामान्य भातामध्ये मिसळले जाते. FSSAI नुसार, 1 किलो तांदळात 10 ग्रॅम फोर्टिफाइड तांदूळ जोडले जातात.
हा भात जरी सामान्य भातासारखा दिसत असला तरी त्यात असे अनेक पोषक घटक असतात जे मानवी आरोग्यासाठी आवश्यक मानले जातात. इतर सामान्य भाताच्या तुलनेत त्यात लोह, व्हिटॅमिन बी-12, फॉलिक अॅसिड जास्त असते. याशिवाय व्हिटॅमिन-ए, बी आणि झिंक देखील त्यात आढळतात. याद्वारे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर होते.
फोर्टिफाइड तांदूळ पोषक तत्वांनी समृद्ध असतो. माहितीनुसार, एक किलो फोर्टिफाइड तांदळात लोह (28 ते 42.5 मिलीग्राम), फॉलिक ऍसिड (75 ते 125 मायक्रोग्रॅम), व्हिटॅमिन बी 12 (0.75 ते 1.25 मायक्रोग्राम) असते. याशिवाय FSSAI ने झिंक (10 ते 15 मिग्रॅ), व्हिटॅमिन ए (500-700 मायक्रोग्रॅम), व्हिटॅमिन बी1 (1-1.5 मिग्रॅ) ची शिफारस केली आहे. व्हिटॅमिन बी 2 (1.25-1.75 मिग्रॅ), व्हिटॅमिन बी3 (12.3-20 मिग्रॅ) आणि व्हिटॅमिन बी6 (1.5-2.5 मिग्रॅ) सह तांदूळ मजबूत करण्यासाठी देखील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एकदा तयार झाल्यानंतर ते 12 महिन्यांपर्यंत खाल्ले जाऊ शकते.