78th Independence Day: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना देशाच्या लोकसंख्येत बदल घडवून आणण्याच्या कटात सामील असलेल्या घुसखोरांबाबत इशारा दिला. याचवेळी त्यांनी या घुसखोरांचे हेतू नेस्तनाबूत कऱण्यासाठी नव्या योजनेचीही घोषणाक केली. या भाषणात पंतप्रधान मोदींनी आदिवासी स्वातंत्र्यवीर भगवान बिरसा मुंडा यांचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. मोदींच्या या विधानांमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि सांस्कृतिक ओळख जपण्याच्या विषयाला नव्याने चालना मिळाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आज मी एका चिंतेबद्दल आणि आव्हानाकडे तुमचे लक्ष वेधत आहे. एका सुनियोजित कटाच्या अंतर्गत, देशाची लोकसंख्या बदलली जात आहे, भारतात एका नवीन संकटाची बीजे पेरली जात आहेत, हे घुसखोर माझ्या देशातील तरुणांचे जीवनमान हिरावून घेत आहेत, हे घुसखोर माझ्या देशातील बहिणी आणि मुलींना लक्ष्य करत आहेत. हे घुसखोरांकडून निष्पाप आदिवासींची दिशाभूल करून त्यांच्या जमिनींवर हडपल्या केला जात आहेत. म्हणून, जेव्हा लोकसंख्याशास्त्रीय बदल होतो तेव्हा सीमावर्ती भागात असे घडते, तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी संकट निर्माण होते.
Indian Oil चा तिमाही नफा दुप्पट, सोमवारी शेअरची किंमत वाढण्याची शक्यता, जाणून घ्या
सामाजिक तणाव पेरला जात असून कोणताही देश आपला देश घुसखोरांच्या हाती देऊ शकत नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवल आहे. या महापुरूषांबद्ल खरा आदर म्हणजे या घुसखोरांना योग्य ती शिक्षा देणे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. त्यासाठी आपण आपण ‘हाय पॉवर डेमोग्राफी मिशन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, या मोहिमेद्वारे, आपण या गंभीर संकटावर मात करायची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून संबोधित करताना म्हणाले की, एकेकाळी १२५ जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाने आपली मुळे पसरवली होती. आपले आदिवासी तरुण माओवाद्यांच्या तावडीत अडकले होते. आज नक्षलग्रस्त १२५ जिह्यांची संक्या २० पर्यंत कमी केली आहे. आपण त्या आदिवासी समाजांची सर्वात मोठी सेवा केली आहे. एक काळ असा होता जेव्हा बस्तरची आठवण येताच माओवाद, नक्षलवाद, बॉम्ब आणि बंदुकांचे आवाज ऐकू येत होते. त्याच बस्तरमध्ये, माओवाद आणि नक्षलवादापासून मुक्त झाल्यानंतर, बस्तरचे तरुण ऑलिंपिकमध्ये सहभागी होतात.
घरफोड्यांसोबतच उघड्या दरवाजांमधूनही चोऱ्या; पुण्यातील ‘या’ भागातून लाखोंचा ऐवज चोरला
हजारो तरुण ‘भारत माता की जय’ असा जयघोष करत क्रीडा क्षेत्रात प्रवेश करतात, जे क्षेत्र एकेकाळी रेड कॉरिडॉर म्हणून ओळखले जात होते ते आज विकासाचे ग्रीन कॉरिडॉर बनत आहेत, भारतातील जे क्षेत्र लाल रंगाने रंगवले गेले होते, आम्ही तिथे संविधान, कायदा आणि विकासाचा तिरंगा फडकवला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. येत्या दिवाळीत जीएसटी सुधारणा लागू करण्यात येणार असून त्यातून नागरिकांना करसवलत मिळणार आहे. तसेच, आजपासून प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांना सरकारकडून थेट १५,००० रुपये दिले जातील. याशिवाय, रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी संबंधित कंपन्यांनाही आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल. सरकारच्या अंदाजानुसार, या योजनेमुळे देशभरातील सुमारे ३.५ कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.