
Who Is Gadi Eisenkot? (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
एकीकडे सत्तास्थापनेचा मार्ग जटील झालेला असताना, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी गादी आयझेनकॉट यांची नवं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी निवड केली आहे. गादी आयझेनकॉट हे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे सर्वात प्रबळ प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. Who Is Gadi Eisenkot?
इस्रायलमध्ये सध्या मोठा राजकीय गोंधळ चालू आहे. गेल्या आठवड्यात निवडणूक झाली, पण कोणालाच बहुमत मिळालं नाही. ना नेतन्याहूंच्या गटाला, ना आयझेनकॉटच्या गटाला. संसदेत 120 जागा आहेत, सरकार बनवायला 61 लागतात. पण एकट्या कोणाकडेही 61 नाहीत. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांना सगळ्या पक्षांशी बोलावं लागलं.
शेवटी राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी आयझेनकॉट यांना पहिली संधी दिली. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने सांगितलं, आयझेनकॉट यांना 67 तर नेतन्याहू यांना 46 शिफारसी मिळाल्या आहेत. म्हणजे जास्त पक्षांचा पाठिंबा आयझेनकॉटला आहे.
इस्रायलमध्ये राष्ट्राध्यक्षांना हा अधिकार आहे. जास्त जागा असलेल्या पक्षाच्याच नेत्याला बोलवायचं असं बंधन नाही. ज्याला युती जमवता येईल, त्याला बोलवता येतं. आता आयझेनकॉट यांच्याकडे 28 दिवस आहेत. गरज पडली तर अजून 14 दिवस वाढून मिळतील.
गादी आयझेनकॉट हे राजकारणात नवीन आहेत. त्यांनी 2022 मध्ये राजकारणात पाय ठेवला. आधी ते नॅशनल युनिटी पक्षात होते, नंतर मतभेदामुळे बाहेर पडले. गेल्या वर्षी त्यांनी स्वतःचा ‘याशार’ नावाचा पक्ष काढला. याशार म्हणजे सरळ किंवा प्रामाणिक. तेव्हापासून ते नेतन्याहूंचे मुख्य विरोधक बनले.
पण त्यांचा राजकारणात येण्यामागे एक मोठं दुःख आहे. त्यांचा मुलगा गाल आयझेनकॉट. तो त्यांचा सगळ्यात लहान मुलगा होता. डिसेंबर 2023 मध्ये उत्तर गाझामध्ये एका स्फोटात तो मारला गेला. तो हमासने ओलीस ठेवलेल्या दोन इस्रायली लोकांचे मृतदेह आणायला गेला होता.
वंदे भारत स्लीपरमध्ये ‘तत्काळ कोटा’ नाही; भारतीय रेल्वेकडून घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय
आयझेनकॉट सांगतात, मुलाच्या वस्तू अजून खोक्यातच आहेत. त्या त्यांनी अजून उघडल्या पण नाहीत. “मी त्या बघणं सारखं पुढे ढकलतोय,” असं ते एका रेडिओ मुलाखतीत म्हणाले होते. फक्त मुलगाच नाही, गाझामध्ये त्यांचे दोन पुतणे पण गेले. आणि 7 ऑक्टोबर 2023 चा हल्ला रोखण्यात नेतन्याहू सरकार फेल झालं, असं त्यांना वाटतं. या सगळ्यामुळे ते राजकारणात आले.
ते म्हणतात, “मी काळ मागे फिरवू शकत नाही. पण गालने जी किंमत मोजली, त्याला न्याय मिळवण्यासाठी मी सर्व प्रयत्न करेन.” नेतन्याहूंना जबाबदार धरणं, हेच त्यांचं मुख्य ध्येय आहे.
7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर आयझेनकॉट यांनी नेतन्याहूंच्या युद्ध मंत्रिमंडळात प्रवेश केला होता. पण जून 2024 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा आरोप होता, ओलीस असलेल्या लोकांना सोडवण्यासाठी नेतन्याहू गंभीर नाहीत.
यावर नेतन्याहू म्हणतात, आयझेनकॉट यांनी गाझामधल्या लष्करी कारवाईला विरोध केला होता. त्यांनी म्हटलं होतं, करार करा, ओलीस सोडवा आणि गाझामधून बाहेर पडा. जर तसं केलं असतं तर हमास आजही जिवंत असता, असं नेतन्याहूंचं म्हणणं आहे.
आयझेनकॉट यांनी हा दावा फेटाळला आहे. त्यांनी नेतन्याहूंना युद्ध मंत्रिमंडळाच्या बैठकीचे रेकॉर्ड जाहीर करायला सांगितलं आहे.
निवडणुकीआधी त्यांनी सांगितलं होतं, निवडून आलो तर 18 महिन्यात हमास संपवेन. त्यांना टू-स्टेट सोल्युशन मान्य नाही. म्हणजे शेजारी पॅलेस्टिनी देश बनवणं त्यांना पटत नाही. पण पॅलेस्टिनी प्राधिकरणासोबत संबंध नव्याने ठरवायचे आहेत, असं ते म्हणतात. “मला 28 लाख पॅलेस्टिनी लोकांवर राज्य करायचं नाही,” असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.ते मोठ्या वसाहतींच्या विस्ताराला पाठिंबा देतात, पण जेरुसलेमजवळच्या E1 भागात वसाहत वाढवायला त्यांचा विरोध आहे. तसेच 7 ऑक्टोबर हल्ल्याची चौकशी करायची, हे त्यांचं मोठं आश्वासन आहे. नेतन्याहू यांनी ती चौकशी नेहमीच नाकारली आहे.
देशात वायुप्रदूषणाची समस्या बनतेय जीवघेणी; वर्षाला होतोय 20 लाख लोकांचा मृत्यू
सगळ्यांसाठी लष्करी किंवा नागरी सेवा सक्तीची करणं. यात अति-रूढीवादी ज्यू आणि अरब इस्रायली पण येतील. यावरून आधीच वाद झाला आहे.
आयझेनकॉट यांचा जन्म तिबेरियासमध्ये झाला, ते इलॅटमध्ये मोठे झाले. त्यांचे आई-वडील मोरोक्कोमधून आले होते. 1950 मध्ये इस्रायलमध्ये स्थायिक झाले. त्यांची आर्थिक स्थिती सामान्य होती. मोरोक्को, मध्य पूर्वेतून आलेल्या ज्यूंना मिझराही म्हणतात. आजपर्यंत कोणताही मिझराही माणूस इस्रायलचा पंतप्रधान झालेला नाही.
मिझराही लोक त्यांना “डायलिना” म्हणतात, म्हणजे आमच्यापैकी एक. नेतन्याहू हे पूर्व युरोपातून आलेल्या श्रीमंत कुटुंबातले. त्यामुळे हा फरक लोकांना जाणवतो. आयझेनकॉट 18 व्या वर्षी सैन्यात भरती झाले. 40 वर्षं सैन्यात राहिले. 2015 ते 2019 ते लष्करप्रमुख होते.आता प्रश्न आहे, त्यांना सरकार बनवता येईल का? नेतन्याहू हे राजकीय खेळात खूप हुशार आहेत. त्यांनी 10 निवडणुका लढवल्या, 6 वेळा सरकार बनवलं. त्यांचा आरोप आहे, आयझेनकॉट यांना अरब पक्षांच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनवता येणार नाही. आयझेनकॉट यांनी अरब पक्षांना सरकारमध्ये घेणार नाही, असं सांगितलंय. पण अल्पमताचं सरकार बनवायचा पर्याय त्यांनी पूर्ण बंद केलेला नाही. पुढचे 28 दिवस इस्रायलसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत.