Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण होते जर्नेलसिंग भिंद्रनवाले? ज्यांच्यासोबत अमृतपाल सिंगची होतेय तुलना, ऑपरेशन ब्लू स्टारदरम्यान गेलाय जीव

1980च्या दशकात पंजाबमध्ये फुटिरतावादी चळवळीनं वेग घेतला होता. खलिस्तान म्हणजेच वेगळ्या पंजाबच्या मागणीसाठी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आलं.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 24, 2023 | 04:16 PM
कोण होते जर्नेलसिंग भिंद्रनवाले? ज्यांच्यासोबत अमृतपाल सिंगची होतेय तुलना, ऑपरेशन ब्लू स्टारदरम्यान गेलाय जीव
Follow Us
Close
Follow Us:

पंजाबमधील खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Waris Punjab De chief Amritpal Singh) गेल्या काही दिवसापासुन खळबळ माजवतोय. गुरुवारी त्यांच्या समर्थकांनी पंजाब मधील अजनाळा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात त्याच्या समर्थकाच्या सुटकेसाठी गोंधळ घातला त्यांनतर अमृतपाल सिंगंच नाव देशभरात चांगलच गाजतय. पंजाब पोलिसांच्या नाकी नऊ आणणारा हा अमृतपाल सिंगची तुलना खलिस्तानी समर्थक जर्नेलसिंग भिंद्रनवाले ( Jarnail Singh Bhindranwale) यांच्यासोबत होत आहे. कोण आहेत जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांचं पंजाब सोबत त्यांची कशी जुळलेली आहे जाणुन घेऊया. 

[read_also content=”कोण आहे खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग? ज्याने पंजाब पोलिसांच्या नाकी नऊ आणले, वारिस दे पंजाब संघटनेचं नेमकं काम काय? https://www.navarashtra.com/latest-news/who-is-amritpal-singh-what-waris-punjab-de-organization-do-nrps-371974.html”]

अमृतपाल सिंगचं नाव नेमकं कोणत्या प्रकरणामुळे गाजतयं?

ज्या अमृतपालच्या नावाने सगळा गोंधळ सुरु आहे ते त्याने नेमकं काय केलं ते जाणुन घ्या. अमृतपालचा समर्थक लवप्रीत तुफानवर बरिंदर सिंग यांचे अपहरण आणि प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अमृतपाल आणि त्यांच्या समर्थकांनी अजनाळा पोलिस ठाण्याचा त्याच्या सुटकेसाठी चांगलाच गोंधळ घातला.  यावेळी समर्थकांच्या हातात बंदुका, तलवारी, काठ्या होत्या घेत पोलिस स्टेशनमध्ये चांगलाच राडा केला.  सुमारे आठ तास चाललेल्या गोंधळानंतर पोलिसांनी लवप्रीत तुफानला सोडण्यास तयार झाल्यानंतर आंदोलन थोड शांत झालं.

जर्नेलसिंग भिंद्रनवालेंशी केली जातेय तुलना

आता या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या अमृतपाल सिंगची तुलना जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्याशी केली जात आहे. त्याला भिंद्रनवाला 2.O असेही म्हण्टलं  जातय. याचे कारण तोही भिंद्रनवाले सारखा खलिस्तानी समर्थक आहे. अमृतपाल सिंग भिंद्रनवालेसारखा निळा पगडी घालतो. इतकंच नाही तर अमृतपालने गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी  ‘वारीस पंजाब दे’ संघटनेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त हे भिंद्रनवाले यांचे मुळगावी म्हणजेच मोगा जिल्ह्यातील रोडे गावात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोण आहे जर्नेलसिंग भिंद्रनवाले

1980च्या दशकात पंजाबमध्ये फुटिरतावादी चळवळीनं वेग घेतला होता. खलिस्तान म्हणजेच वेगळ्या पंजाबच्या मागणीसाठी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आलं. जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा जन्म २ जून १९४७ रोजी रोडे गावात झाला. सिद्ध धर्म आणि धर्मग्रंथ शिकवणाऱ्या ‘दमदमी टकसाल’ या संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली तेव्हा त्यांच्या नावाशी भिंद्रनवाले जोडले गेले. अवघ्या वय ३० च्या वयात त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली.  दमदमी-टकसालची कमान हाती घेतल्यानंतर काही महिन्यांनी भिंद्रनवालेने पंजाबमध्ये अशांतता निर्माण केली.

 13 एप्रिल 1978 ला अकाली कार्यकर्ते आणि निरंकारी यांच्यात हिंसक संघर्ष झाला.

या चकमकीत तेरा अकाली कार्यकर्ते ठार झाले. त्यांनतर जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांनी चळवळीत भाग घेतला. भिंद्रनवाले यांनी पंजाब आणि शीखांच्या मागणीबाबत कठोर वृत्ती स्वीकारली. त्यांनी ठिकठिकाणी प्रक्षोभक भाषणे देण्यास सुरुवात केली. पंजाबमध्ये 80 च्या दशकाच्या सुरुवातीला हिंसक घटना वाढू लागल्या. 1981 मध्ये पंजाब केसरीचे संस्थापक आणि संपादक लाला जगत नारायण यांची हत्या करण्यात आली होती. पंजाबमध्ये वाढत्या हिंसक घटनांसाठी भिंद्रनवालेला जबाबदार धरण्यात आलं होतं, परंतु त्याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्यामुळे त्याला अटक करता आली नाही.  दरम्यान, एप्रिल 1983 मध्ये पंजाब पोलिसांचे डीआयजी एएस अटवाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. काही दिवसांनंतर बंदूकधारी पंजाब रोडवेजच्या बसमध्ये घुसले आणि त्यांनी अनेक हिंदूंना ठार केले. वाढत्या हिंसक घटनांमध्ये इंदिरा गांधींनी पंजाबमधील काँग्रेस सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली.

ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये गमावला जीव

1982 मध्ये भिंद्रनवाले यांनी सुवर्ण मंदिरामध्येच त्यांच वास्तव्य होतं. काही महिन्यांनंतर, भिंद्रनवाले यांनी शिख धर्माची सर्वोच्च संस्था अकाल तख्त येथे आपले विचार मांडण्यास सुरुवात केली. पंजाबमधील वाढत्या हिंसक घटना रोखण्यासाठी भिंद्रनवालेला पकडणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी इंदिरा गांधींच्या सरकारने ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ सुरू केले. 

1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार सुरू करण्यात आलं. १ जूनपासूनच लष्कराने सुवर्ण मंदिराला वेढा घालण्यास सुरुवात केली. पंजाबकडे जाणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्या. बससेवा बंद करण्यात आली. फोन कनेक्शन कट करण्यात आले आणि परदेशी माध्यमांना राज्य सोडण्यास सांगण्यात आले. ३ जून १९८४ रोजी पंजाबमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला. 4 जूनच्या संध्याकाळपासून लष्कराने गोळीबार सुरू केला. दुसऱ्या दिवशी सैन्याची चिलखती वाहने आणि रणगाडेही सुवर्ण मंदिरात पोहोचले. भयंकर रक्तपात झाला. भिंद्रनवाले यांची ६ जून रोजी हत्या झाली.

सुवर्ण मंदिरावरील केंद्र सरकारच्या या कारवाईचा देशभरातून विरोध झाला. शीख समाजाने त्यावर टीका केली. काँग्रेसमध्येही फूट पडली. या कारवाईत सर्वसामान्यांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी राजीनामा दिला. अनेक शीख लेखकांनी त्यांचे पुरस्कार परत केले. अधिकृत आकडेवारीनुसार या कारवाईत 83 जवान शहीद तर 249 जखमी झाले. त्याचवेळी 493 अतिरेकी किंवा सामान्य नागरिक मारले गेले आणि 86 लोक जखमी झाले. 1592 लोकांना अटक करण्यात आली.

Web Title: Who was jarnail singh bhindranwale comparing with khalistan supporter amritpal singh nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2023 | 03:40 PM

Topics:  

  • Amritpal Singh
  • Punjab Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.