नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी मार्लेना यांची आम आदमी पार्टी (आप) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेता म्हणून निवड करण्यात आली. त्या आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. आतिशी आज (17 सप्टेंबर) संध्याकाळी लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना यांची भेट घेतील आणि सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी मंत्री आतिशी यांना त्यांच्या जागी पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव ठेवला, जो आप आमदारांनी एकमताने स्वीकारला. ही बैठक 20 ते 25 मिनिटे चालली, अशीही माहिती आहे. पण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पाच जणांची नावे असताना आतिशी यांचीच कशी निवड झाली. याबाबत सर्वानाच उत्सुकता आहे.
हेही वाचा : Delhi New CM : आतिशी होणार दिल्लीचे नवे मुख्यमंत्री, 11 वर्षांनंतर एक महिला राजधानीची कमान सांभाळणार
याबाबत दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील आपचे आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केल आहे. ” सर्व आमदार बसले आणि सर्वांशी चर्चा सुरू झाली. आमचा अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास आहे, पुढचा मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार अरविंद केजरीवाल यांना आहे, असा ठराव सर्व आमदारांनी एकमताने मांडला आणि आम्ही मरेपर्यंत एकत्र उभे राहू असे सांगितले. तुम्ही (अरविंद केजरीवाल) जो निर्णय घ्याल तो मान्य आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रस्ताव मांडला.
दरम्यान, बैठकीपूर्वीच दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. सीएम केजरीवाल यांची सर्वात विश्वासू व्यक्ती, महिला चेहरा आणि चांगले शिक्षण यामुळे आतिशी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत पहिल्या दिवसापासूनच पुढे होत्या. सीएम केजरीवाल तुरुंगात असताना त्यांनी पक्ष आणि दिल्लीची जबाबदारी घेतली आणि ती अगदी योग्यपणे हाताळलीही. मनीष सिसोदिया तुरुंगात असताना आतिशी यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी घेतली होती.
हेही वाचा : Jio network down: Jio चं नेटवर्क डाऊन, युजर्सना करावा लागतोय समस्यांचा सामना
तर अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी त्या मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नसल्याचे स्प्ष्ट केले होते. तसेच. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसले आहे याने काही फरक पडत नाही. कारण दिल्लीतील जनतेचा जनादेश अरविंद केजरीवाल यांना होता, असे सौरभ भारद्वाज यांनी आधीच सांगितले होते. अशा परिस्थितीत सीएम केजरीवाल यांच्या सर्वात विश्वासू फायरमनचे आतिशी मार्लेना यांचे नाव आघाडीवर आले, आणि त्यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. जेव्हा लोक त्यांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देतील तेव्हाच आपण पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील आपचे आमदार अखिलेश पती त्रिपाठी म्हणाले की, केजरीवाल आज संध्याकाळी नायब राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देणार आहेत.आता आतिशी मार्लेना या ‘आप’चा प्रमुख चेहरा असतील. त्यांच्याकडे वित्त, शिक्षण आणि PWD (सार्वजनिक बांधकाम विभाग) यांसह अनेक विभागांचा कार्यभार आहे.
हेही वाचा : ‘लालबागच्या राजाला’ साश्रूपूर्ण निरोप, विसर्जनाचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी