Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला आरक्षण विधेयकावरून विरोधक आक्रमक, विधेयक आम्ही आधीच आणले असल्याचा, कॉंग्रेसचा दावा

Women Reservation Bill : संसदेतील गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 19, 2023 | 04:23 PM
महिला आरक्षण विधेयकावरून विरोधक आक्रमक, विधेयक आम्ही आधीच आणले असल्याचा, कॉंग्रेसचा दावा
Follow Us
Close
Follow Us:

Women Reservation Bill : महिला आरक्षण (Women Reservation Bill) विधेयकावरून लगेचच वाद निर्माण झाला. हे विधेयक आम्ही आधीच आणलं होतं, असा दावा काँग्रेसनं केला. तर तुम्ही आणलेलं विधेयक कधीच lapse अर्थात रद्दबातल झालं, असं प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिले आहे.

लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले आहे.  विरोधकांनी गदारोळ सुरू केला आहे. हे विधेयक आम्ही आधीच आणलं होतं. तसेच विधेयकाची प्रत देखील अद्याप आम्हाला मिळाली नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यावर कायदामंत्री म्हणाले की, हे विधेयक वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहे. जेव्हा एखादे विधेयक सभागृहात मांडले जाते तेव्हा त्याची प्रत आधी खासदारांना देणे आवश्यक असते. यावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. संसदेतील गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

विधेयक मोदी सरकार संसदेत मांडणार

संसदेत महिला आरक्षणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, अशी घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नव्या संसदेत प्रवेश केल्यावर ते बोलत होते. यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागणार आहे, आणि त्याबाबतचे विधेयक मोदी सरकार संसदेत मांडणार आहे. लोकसभेत उद्याच हे विधेयक मांडले जाईल, अशी अपेक्षा आहे. विधेयक मंजूर झाल्यावर संसद आणि राज्यांमधील विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण असणार आहे. मात्र, याची अंमलबजावणी तातडीने होणार नाही, तर 2026 मध्ये नियोजित मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावर महिला आरक्षण लागू होईल, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

लोकसभा-विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण

महिला आरक्षण विधेयकांतर्गत विधानसभेच्या 33 टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. याशिवाय लोकसभेतही महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. म्हणजेच, 181 जागा महिलांसाठी राखीव असतील. तसेच, दिल्ली विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे.

सध्या लोकसभेत महिला खासदारांची टक्केवारी किती?

सध्याच्या लोकसभेत 78 महिला खासदार आहेत, जे प्रमाण एकूण 543 च्या 15 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, ओडिशा, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा आणि पुद्दुचेरीसह अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 10 टक्क्यांहूनही कमी आहे. दरम्यान, गेल्या काही आठवड्यांत काँग्रेस, बीजू जनता दल (BJD) आणि भारत राष्ट्र समिती (BRS) सह अनेक पक्षांनी महिला आरक्षण विधेयक आणण्याची मागणी केली आहे.

Web Title: Women reservation bill controversy over women reservation bill we had already introduced the bill claimed by congress nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2023 | 04:21 PM

Topics:  

  • Prime Minister Narendra Modi
  • Women Reservation Bill

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.