Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… त्यामुळे हा आमचा शेवटचा इशारा आहे”; काँग्रेसमध्ये जाताच बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान स्टार कस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षात पुनियाने दोन दिवसांपूर्वीच प्रवेश केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 08, 2024 | 08:01 PM
"... त्यामुळे हा आमचा शेवटचा इशारा आहे''; काँग्रेसमध्ये जाताच बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी

"... त्यामुळे हा आमचा शेवटचा इशारा आहे''; काँग्रेसमध्ये जाताच बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी

Follow Us
Close
Follow Us:

हरियाणा विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. एकीकडे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपमध्ये नाराज नेते बंडखोरीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भाजप डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करत आहे. अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान स्टार कस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षात पुनियाने दोन दिवसांपूर्वीच प्रवेश केला आहे.

स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाने बजरंग पुनियाला किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष पद देण्यात आले आहे. मात्र आता त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बजरंग पुनियाला परदेशातील नंबरवरून व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला आहे. त्यातून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या मेसेजमध्ये, ”बजरंग काँग्रेस सोड. नाहीतर तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे चांगले होणार नाही. त्यामुळे हा आमचा शेवटचा इशारा आहे”, अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे.

जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर बजरंग पुनिया यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळत आहेत. मेसेज करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच बजरंग पुनियाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बजरंग पुनिया यांनी पक्षात प्रवेश करताच काँग्रेसचे आभार मानले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी भाजपवर टीका केली. आम्ही भाजपकडे मदत मागितली होती, तरीही ते आम्हाला साथ देऊ शकले नाहीत, मात्र काँग्रेसने आम्हाला नेहमीच साथ दिली. विनेशच्या पराभवावर संपूर्ण देश रडत होता पण एक आयटी सेल जल्लोष करत होता, अशा शब्दांत बजरंग पुनियाने भाजपच्या आयटी सेलवर निशाणा साधला.

हेही वाचा: खेळाचे मैदान सोडल्यानंतर विनेश फोगाट, बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकारणात नशीब आजमावणार

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या दोन दिवस आधी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यानंतर आता हे दोघे काँग्रेसकडून कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार याची चर्चा रंगली आहे. काँग्रेस अध्यक्षांना भेटण्यापूर्वी दोघांनीही रेल्वेची नोकरी सोडली. ही माहिती देत ​​त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले, “भारतीय रेल्वेची सेवा हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानास्पद काळ आहे. माझ्या आयुष्याच्या या वळणावर, मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे माझे राजीनामा पत्र सादर केले आहे. देशसेवेसाठी रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराचा सदैव ऋणी राहीन.”

Web Title: Wrestler bajrang punia received death threats after joining congress party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 07:35 PM

Topics:  

  • Bajrang Punia

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.