
मुंबई : मुंबईत पट्रोल-डिझेलच्या पाठीमागून भाज्यांचे दर सुद्धा गगनाला भिडले आहेत, त्यामुळं भाज्यांच्या दरवाढीमुळं ऐन दिवाळीच्या तोंडावर सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार असून, गृहणीचं बजेट कोलमडणार आहे. अवकाळी पाऊस आणि आवक घटल्याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट बिघडलं आहे. एकिकडे कोरोनाचे संकट असताना, दुसरीकडे महागाईने सामान्य जनता पिचली आहे. मुंबईत पट्रोल-डिझेलने शंभरी पार केली आहे. आणि आता भाज्या कडाडल्यामुळं जर भाज्या इतक्या महाग झाल्या तर खायचं काय? आणि जगायचं कसं? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
प्रत्येक भाज्यांमागे ३० ते ४० रुपये प्रतिकिलो भाव वाढला आहे. वाशी येथील एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात आवक कमी झाल्याने दर कडाडले आहेत. “घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळीत दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहेत. तसेच अवकाळी पाऊस आणि आवक घटल्याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झाला आहे. असं एपीएमसी बाजारातील व्यापारी शंकर पिंगळे यांनी सांगितलं आहे” इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पयार्य नसल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.
कोथिंबीर जुडी १००च्या घरात
वाशीतील एपीएमसी बाजारात कोथींबीरची जुडी ५० ते ६० रुपयांनी विकली जात आहे, तर अन्य ठिकाणी ७० ते ८० रुपये विकली जात आहे. राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर सध्या नागपुरात विकली जातेय. सध्या नागपूरातील किरकोळ बाजारात कोथिंबीरचा दर ३२० रुपये किलोंवर पोहोचलाय. लांबलेल्या पावसाने पिकांना चांगले झोडपून काढल्याने कोथिंबीर जागेवरच खराब झालीये. त्यामुळे आवक कमी झाल्याने सध्या कोथिंबीर महाग झाल्याचे भाजी विक्रेत्यांनी म्हटले आहे.
पट्रोल पाठोपाठ डिझेलने ठोकले शतक
एकीकडे पेट्रोल, डिझलने शंभरी पार केली आहे. तर दुसरीकडे घरगुती सिलेंडर एक हजाराच्या उंबरठ्यावर पोहचलंय. मुंबईत पट्रोल-डिझेलने शंभरी पार केली आहे. पट्रोल ११२ रुपये तर डिझेल १०१ रुपयांनी विकले जात आहे, अशात आता ऐन दिवाळीच्या तोंडावर भाजीपाल्यानेही महागाईत भर घातलीये. त्यामुळं सामान्य जनतेनं जगायचं कसं? असा संतप्त सवाल लोकांनी उपस्थित केला आहे.