
fraud
पुणे : अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक झालेल्या काळात अमेरिकेतील एका कंपनीने पुण्यातून हँडग्लोज आणि पेपर बॅग्सची मागणी केली व त्याचे ३ कोटी रुपये देखील पेड केले. पण, त्या कंपनीला पेपर बॅग्स व हँडग्लोज न देता तसेच पैसे परत न करता त्या कंपनीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील कंपनी व त्याच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
नऱ्हे येथील पॅकस्पेस एंटरप्राजझेसचे हार्दिक ओसवाल, दिपक सुतार व प्रदिप तांगडे यांच्यावर सिहंगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ४१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुंबई येथील आहेत. त्या न्यूयॉर्क पॅकेजिंग आयआय एलएलसी न्यूयॉर्क अमेरिका कंपनीच्या लिगल ऍडव्हायझर आहेत. दरम्यान, जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्या काळात त्यांना हँडग्लोज व पेपर बॅग्सची आवश्यक्ता होती. त्यामुळे त्यांनी भारतीय म्हणजेच पुण्यातील या पॅकस्पेस एंटरप्रायझेस कंपनीकडे मागणी केली होती. त्याची पर्चेस ऑर्डर केली. त्यापोटी ऍडव्हान्स म्हणून या कंपनीने ३ कोटी रुपये दिले होते.
मात्र, आरोपींच्या कंपनीकडून त्यांना कोणताही माल पुरवण्यात आला नाही. तसेच त्यांना समुद्रामार्गे माल पाठवत असल्याचे खोटे सांगून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.