सेंट झेवियर्स कॉलेजच्या मल्हार महोत्सवामध्ये मुंबईभरातील विद्यार्थ्यांनी कला, संस्कृती आणि सृजनशीलतेचा उत्सव साजरा केला. या फेस्टीव्हल दरम्यान अनेक स्पर्धा, चर्चासत्र, प्रतिष्ठित व्यक्तींशी, कलाकारांशी संवाद साधला गेला. 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान हा लोकप्रिय महोत्सव आयोजित केला होता. मल्हार महोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थीप्रिय ठरला.
मल्हारमधील चर्चासत्रे, परफॉर्मन्स
कन्क्लेव्ह सत्रांमध्ये महाराष्ट्राच्या अँटी-करप्शन ब्युरोच्या एडीजी विश्वास नांगरे पाटिल यांचे प्रेरणादायी भाषण, आणि डॉ. राधाकृष्णन पिल्लई, डॉ. समीर पाटील आणि अनन्या बिर्ला यांच्या चर्चासत्रांचा समावेश होता.
मल्हार फेस्टीव्हलमध्ये अभिनेता,विजय वर्मा,अभिनेत्री दिया मिर्झा आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यानी त्यांच्या आगामी नेटफ़्लिक्स ओरिजिनल थ्रिलर सीरीज ‘आयसी-८१४’ बद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला . विजय वर्मा यांनी पायलटच्या धैर्याचे कौतुक केले आणि भूमिकेला न्याय करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सिन्हा यांनी सीरीजचे वर्णन “सर्वत्र पसरलेली एक थरारक मालिका” म्हणून केले.
मल्हार कॉन्क्लेव्हमध्ये अनैता श्रॉफ अदजानिया आणि श्रिया पिळगावकर या वक्त्या होत्या. अनैता यांनी एक आघाडीची बॉलीवूड स्टायलिस्ट आणि वोग इंडियाचे संस्थापक फॅशन डायरेक्टर, तिने महत्वाकांक्षी फॅशन डिझायनर ते इंडस्ट्री आयकॉन असा तिचा प्रवास सांगितला. श्रिया पिळगावकरने, कलेतील तिचे अनुभव आणि सर्जनशीलता आणि चिकाटी यावर चर्चा केली.
“ब्रेक के बाद” बॉलीवूड अभिनेता इम्रान खानने सत्रात मंचावर उपस्थित राहून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. डॉ राहुल बक्षी, डॉ सईदा रुखसेदा, डॉ रायन फर्नांडो आणि डॉ खुजैमा मामा या तज्ञांच्या वैद्यकीय पॅनेलने आपले विचार मांडले. हिरामंडी मधील प्रसिद्ध ताहा शाह बडूसशा यांच्या व्हॉट नाऊ मूव्हमेंटचे सायबर क्राईम विरुद्ध प्रयत्न या विषयावरील चर्चा झाली.
माइक ड्रॉप कार्यशाळेच्या निमित्ताने विजय विक्रम सिंग यांच्या आवाज अभिनयाच्या कार्यशाळेत व्यावसायिक आणि संभाषणात्मक आवाज, योग्य श्वासोच्छ्वास आणि स्वर व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रेक्षकांना गुंतवून ठेवत, त्याने व्यावहारिक टिप्स, वैयक्तिक अनुभव सामायिक केले आणि लवचिकतेला प्रोत्साहन दिले.”क्लोन अ ड्रोन” या ‘स्पेस गीक्स’ द्वारे आयोजित कार्यशाळेने तंत्रज्ञान प्रेमींचे लक्ष वेधून घेतले,
लोकप्रिय गर्ल ग्रुप W.i.S.H., रॅपर यशराज आणि प्रसिध्द गायक नीरज श्रीधर यांनी परफॉर्मन्स सादर केला. “नादानिया” या हिट गाण्याचा सुप्रसिद्ध गायक अक्षत आचार्य यांच्या थरारक परफॉर्मन्सने महोत्सवात वेगळीच रंगत आणली.
मल्हारमधील प्रमुख स्पर्धा आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड सहभाग
“आर्टाथलॉन” या स्पर्धात्मक कला आणि बुद्धिमत्तेच्या मिश्रणाने झाली, त्यानंतर “प्रेस प्ले” हा संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम झाला, “नवरस” या कार्यक्रमात पौराणिक कथा सजीव करण्यात आल्या.”रागों की बारात” ह्या कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय आणि बॉलिवूड संगीताचे मिश्रण सादर करण्यात आले, ज्यामध्ये गायिका, अभिनेत्री प्रिया रैना आणि गायिका रुचि फोन्सेका यांनी सादरीकरणांचे कौतुक केले.तर “टोस्ट अँड जेम,” ज्याचे नेतृत्व जैम मास्टर अरविंद कृष्णन यांनी केले, यामध्ये सहभागींच्या तर्कसंगत विचारशक्तीची कसोटी घेण्यात आली. क्वाडमध्ये “स्ट्रीट इट अप” या स्ट्रीट डान्स शोने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.फील्ड डॉमिनेशन हा इव्हेंटमधील 7v7 फुटबॉल स्पर्धा ॲक्स आणि मुंबई सिटी एफसी यांनी प्रायोजित केला होता. गुप्तहेर कौशल्यावर आधारित स्पर्धाही घेतली गेली ज्यात १५ हून अधिक संघांनी सहभाग घेतला.
फाईन आर्ट्ससाठी ‘मास्टरपीस मेडले’ ने सहभागींना “शहरी जंगल” या थीमवर आधारित कला सादर केली यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी चित्रकला, स्केचिंग आणि 3D आर्टद्वारे थीमचे जबरदस्त व्हिज्युअल सादरीकरणात रूपांतर झाले. या स्पर्धांसह शायराना रंग, मल्हारी-दिंडी से लेके दांडिया तक,लिटररी आर्ट्स इव्हेंट, ‘फोर्ज अ फॅक्ट’ फाईन आर्ट्सचा ‘मोझॅक मॉन्टेज’, ‘इम्प्रोव ने बनादी जोडी’ वर्ल्ड परफॉर्मिंग आर्ट्स ‘ग्लो अँड बीहोल्ड’ इत्यादी वैविध्यपुर्ण स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या.
अभिनेत्री संदीपा धर, बर्खा सिंग, श्वेता त्रिपाठी शर्मा, रणजीत ठाकूर इत्यादी मान्यवरांनी महोत्सवामध्ये परीक्षक म्हणून कार्य केले. मल्हार फेस्टची सांगता विजेत्यांची घोषणा करून झाली.